A protest was launched against Nigdi police station against illegal activities 
पुणे

अवैध धंद्यांविरोधातील निगडी पोलिस ठाण्यावर बाटली मोर्चा 

रवींद्र जगधने

पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरामधील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांविरोधात अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या नेतृत्वाखाली अंकुश चौक ते निगडी पोलिस ठाण्यावर 'बाटली मोर्चा' काढण्यात आला. मोर्चा दरम्यान अवैध दारू धंदे बंद करा, हफ्तेवसुली करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, गुन्हेगारी थांबवा अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. 

यावेळी संघटनेचे संपर्कप्रमुख हरिश्‍चंद्र तोडकर, महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, बेटींना दास, ऍड मेरी रणपिसे, काँग्रेस अल्पसंख्याक शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, भारिपचे आकील सय्यद, संगीता शहा, आरती कोळी, गणेश हिंगडे, हमीद शेख, कुसुम गायकवाड, जयश्री आचार्य, सद्दाम सय्यद, लतीफ सय्यद, अय्याज शेख, अब्दुल शेख, अनिल कारेकर, हाजीमलंग शेख, दिवेश पिंगळे, इर्शाद शेख, विशाल वाघमारे यांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होते. 

निगडी पोलिस ठाण्यावर मार्चा पोचल्यानंतर याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पळसुले यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळेस त्यांनी निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध दारू धंदे बंद केल्याचे सांगितले. काही ठिकाणी जर अवैध धंदे निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवावे, आम्ही तत्काळ कारवाई करू, असे लेखी आश्वासन दिले. मोर्च्याला उद्देशून अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख म्हणाले, "निगडी पोलिस हद्दीसह संपूर्ण शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलेली आहे. सर्वसामान्य जनता प्रचंड दहशतीखाली जगत आहे. तसेच शहरात काही भ्रष्ट पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध दारू धंदे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. अवैध धंदेवाल्याकडून करोडो रुपयाचा हप्ता वसूल केला जात आहे. काही रुपड्यांसाठी काही राजकीय पुढारी व काही भ्रष्ट पोलिस अधिकारी भारत देशाशी गद्दारी करत आहेत.'' 

शेख म्हणाले, "या अवैध धंद्यांपासून महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत. अनेक तरुण वाममार्गाला जाऊन गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. शहरामध्ये दरवर्षी दोन लाख तरुण दारूच्या आहारी जात आहेत आणि हेच तरुण पुढे जाऊन देशाचा कारभार चालवणार आहेत. परंतु, हे देशाचे भविष्य असलेले तरुण जर गुन्हेगार, भ्रष्ट, बेवडे असतील तर देशाचे भविष्य काय असेल?'' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT