पुणे

पुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार

सकाळवृत्तसेवा

कोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. येथील दुमजली उड्डाण पुलामुळे कर्वे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कर्वे रस्त्यावरील अभिनव चौकातील (नळस्टॉप) दुमजली उड्डाण पुलाचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, नगरसेवक मुरलीधर मोहोळ आदी या वेळी उपस्थित होते. 

मेट्रोसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात नव्या गाड्या उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे ही सेवा विस्तारणार असून, पुणेकरांनीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करत फडणवीस म्हणाले, ‘‘शहरात वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे सुरू असून, त्यातून संपूर्ण शहराचा विकास होणार आहे. लोकांच्या नेमक्‍या गरजा जाणून घेताना त्यांचे जीवनमान उंचाविण्याला प्राधान्य आहे. अनेक वर्षे केवळ चर्चेपुरत्या राहिलेल्या मेट्रोचे पहिल्याच वर्षात २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. नव्या उड्डाण पुलांची शास्त्रशुद्ध पद्धतीने कामे करण्यात येत आहेत. स्वारगेट येथे मेट्रो, बस व एसटी अशा सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकाच ठिकाणी वापरता येतील, असे सुसज्ज ट्रान्सपोर्ट हब तयार केले जाणार आहे.’’

बापट म्हणाले, ‘‘काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात केवळ जाहीरनामे प्रसिद्ध करून आश्वासने देण्यात आली. आमचे सरकार मात्र प्रत्यक्ष कामे करीत आहे.’’

मोहोळ म्हणाले, ‘‘लोकांना भेडसावणारी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी उड्डाण पुलाचे काम लवकर पूर्ण करू. ’’

‘सिंगल तिकीट’ची सुविधा 
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लोकाभिमुख व्हावी, यासाठी मुंबईत मेट्रो, मोनो, उपनगरीय रेल्वे, बस आणि जलवाहतुकीत ‘सिंगल तिकीट’चा प्रयोग राबविण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच तिकिटाच्या माध्यमातून प्रवाशांना अन्य वाहतूक सुविधांचा वापर करता येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पुण्यात मेट्रो आणि ‘पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सेवेसाठी ‘सिंगल तिकीट’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनातून प्रवास करण्याची गरज भासणार नाही. अशा सुविधांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT