बालगंधर्व कलादालन - ‘पुलंचे सामजिक भान’ या परिसंवादामध्ये बोलतांना डॉ.अनिल अवचट. यावेळी डावीकडून गिरीश प्रभूणे, अवचट, डॉ. मंदार परांजपे आणि रेणू गावस्कर.
बालगंधर्व कलादालन - ‘पुलंचे सामजिक भान’ या परिसंवादामध्ये बोलतांना डॉ.अनिल अवचट. यावेळी डावीकडून गिरीश प्रभूणे, अवचट, डॉ. मंदार परांजपे आणि रेणू गावस्कर. 
पुणे

‘पुलं’नी समाजाला सर्व काही दिले (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘पुलं’नी समाजाला झाडून सर्वकाही दिले. स्वतःच्या नावाचा अट्टहास न करता समाजाला सढळ हाताने मदत करीत राहिल्यामुळेच ‘मुक्तांगण’ सारख्या संस्था उभ्या राहू शकल्या, अशी कृतज्ञतेची भावना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केली.

पुलोत्सवामध्ये गुरुवारी आयोजित ‘पुलंचे सामाजिक भान’ या विषयावरील परिसंवादामध्ये सहभागी होताना डॉ. अवचट बोलत होते. गिरीश प्रभुणे आणि रेणू गावस्कर यांनीही सहभाग घेतला. डॉ. अवचट म्हणाले, की ‘पुलं’नी समाजाला चांगुलपणा शिकवतानाच स्वतःच्या दोषांबाबत आत्मपरीक्षणही करण्याचा परिपाठ सांगितला. माझी आणि पुलंची ओळख आमच्यातील तीव्र मतभेदातून झाली. झोपडपट्टी उठवून बालगंधर्व रंगमंदिर बांधण्यास माझा विरोध, तर त्यांचे समर्थन होते. मात्र, माझ्या प्रामाणिक भावनांचा त्यांनी आदर केला. त्यांच्या आग्रहामुळेच ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्राची उभारणी झाली.

रेणू गावस्कर म्हणाल्या, ‘‘सुनीताबाईंना एकदा एका खेड्यातून मुलाचे पत्र आले. आम्हाला शाळेतून काढून टाकतात आणि शेतात किंवा कारखान्यावर मजुरीसाठी पाठवतात, असे त्यात म्हटले होते. ही बाब दोघांनाही प्रचंड अस्वस्थ करून गेली आणि अशा संस्थांना मदतीचा ओघ सुरू झाला. लहान मुलांना आपण गाणे गायचे शिकवू शकलो नाही, याची त्यांना शेवटपर्यंत खंत होती. त्यामुळेच या दांपत्याची वेदना कमी करण्यासाठी आपण आपल्यापरीने प्रयत्न केले पाहिजेत, असे मला सतत वाटत राहते.’’   

गिरीश प्रभुणे म्हणाले, ‘‘युवकांचे सामाजिक भान जागृत करण्याचे मोठे काम ‘पुलं’नी केले. तरुणांना सामाजिक कार्याकडे वळवणारे ते एकमेव लेखक होते.’’

‘पु. ल. परिवार’, ‘आशय सांस्कृतिक’, यांच्या वतीने आणि ‘स्क्वेअर-१’च्या सहयोगाने झालेल्या या परिसंवादामध्ये सूत्रसंचालनाच्या माध्यमातून डॉ. मंदार परांजपे यांनी आमटे कुटुंबीयांचे प्रतिनिधी या नात्याने पुलंविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT