Corona Patient
Corona Patient Sakal
पुणे

पुण्यात दररोज १२१० रुग्ण होताहेत कमी; आतापर्यंत ६६ हजार कोरोनामुक्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहरातील (Pune City) नवीन कोरोना रुग्णांची (New Corona Patient) संख्या मागील दोन आठवड्यांपासून दररोज सरासरी १ हजार २१० ने कमी (Decrease) होऊ लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांत शहरातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या १८ हजार १६३ ने कमी झाली आहे. शिवाय तब्बल ६५ हजार ८६३ जण कोरोनामुक्त (Corona Free) झाले आहेत. (Pune 1210 patients recovering every day So far 66 thousand corona free)

गेल्या पंधरा दिवसांत शहरात ५१ हजार ७८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या आकडेवारीनुसार शहरात सध्या दररोज सरासरी ३ हजार ४०५ नवे रुग्ण आढळून येत असून दररोज सरासरी ४ हजार ३९० जण कोरोनावर मात करत आहेत. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालात नवे रुग्ण, कोरोनामुक्त रुग्ण, दिवसभरात झालेले मृत्यू, उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेले आणि गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची आकडेवारी देण्यात येते. या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी म्हणजेच २५ एप्रिल २०२१ ला पुणे शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ५३ हजार ९२० इतकी होती. हीच संख्या ९ मे रोजी ३५ हजार ७५७ इतकी कमी झाली आहे. पंधरा दिवसांत शहरात सर्वाधिक ४ हजार ८९५ नवे रुग्ण २९ एप्रिलला सापडले होते. तेव्हापासून आजतागायत (ता.९ मे) ही संख्या सातत्याने कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, या पंधरवाड्यात १ मे रोजी सर्वाधिक ६७ रुग्णांचा तर, ९ मे रोजी सर्वात कमी ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाणही १ मेपासून सातत्याने कमी होऊ लागले आहे.

पंधरा दिवसांत ९१५ जणांचा मृत्यू

गेल्या पंधरा दिवसांत (२५ एप्रिल ते ९ मे) पुणे शहरात ९१५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनुसार शहरात दररोज सरासरी ६१ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT