pune lonavala local train sakal
पुणे

पुणे : लोकल प्रवाशांचा हिरमोड; 'त्या' शिक्षकांमुळं मिळाले नाहीत पास

पास घेण्यास आलेल्या प्रवाशांचा मंगळवारी हिरमोड झाला अन त्यांना हेलपाटा पडला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : लोणावळा - पुणे मार्गावरील लोकल प्रवाशांना पास देण्यासाठी महापालिकेने १६ शिक्षकांची नियुक्ती केली खरी, पण त्यांनी पहिल्याच दिवशी दांडी मारली. त्यामुळे पास घेण्यास आलेल्या प्रवाशांचा मंगळवारी हिरमोड झाला अन त्यांना हेलपाटा पडला.

लसीचे दोन डोस झालेल्या प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून परवानगी दिली. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामाध्यमातून प्रवाशांच्या लस प्रमाणपत्राची पडताळणी झाल्यावर त्यांना रेल्वेकडून लोकलचा मासिक पास दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या बाबत दोन्ही महापालिका आणि नगरपरिषदांना आदेश दिला. पुणे महापालिकेने पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर सकाळी ७ ते दुपारी १ आणि दुपारी १ ते ७ दरम्यान अनुक्रमे प्रत्येकी चार शिक्षकांची नियुक्ती केली. त्या शिक्षकांनी प्रवाशांच्या लस प्रमाणपत्राची पडताळणी करून त्यावर शिक्के मारणे अपेक्षित आहे. त्याच्या आधारे प्रवाशांना लोकलचा मासिक पास उपलब्ध होणार आहे. महापालिकेने या बाबतचा आदेश सोमवारी काढला. त्यामुळे मंगळवारी शिवाजीनगर आणि पुणे स्टेशनवर नियुक्त केलेल्या शिक्षकांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने तिकिट खिडकीजवळील सभागृहात त्यांची बसण्याची व्यवस्था केली.

परंतु, पहिल्या दिवशी शिक्षकच आले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना पास मिळाला नाही. या बाबत महापालिकेकडे विचारणा केली असता, बुधवारपासून शिक्षक कामावर येतील, असे सांगण्यात आले. ते जर आले नाही तर, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेकडून या बाबतची अद्याप व्यवस्था झालेली नाही. मात्र, तळेगाव स्थानकावर पास मंजूर करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT