pune terrorist sakal
पुणे

Pune Terrorist News : घरातल्या पंख्यात लपवून ठेवलं...; कोंढव्यातील दहशतवाद्यांबाबत ATS चा मोठा खुलासा

रोहित कणसे

पुण्यात १८ जुलै रोजी दोन दहशतवाद्यांना कोथरूड परिसरातून पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान आता या दहशतवादी राहत होते त्या घरात एटीएसला एक धक्कादायक कागद सापडला आहे. घरातील पंख्याच्या पाईपमध्ये लपनून ठेवण्यात आलेल्या या कागदावर बॉम्ब बनवण्याची माहिती असल्याचे वृत्त समोर आले आहे.

दरम्यान कोंढवा येथे हे दोघे दहशतवादी राहत होते, त्या घरात एटीएसकडून तपासणी करण्यात आली. तेव्हा फॅनच्या पाईपमध्ये बॉम्ब बनवण्याची सर्व माहिती हाताने लिहीलेला कागद लपवून ठेवला होता. यावर बॉम्ब बनवण्याचा सर्व प्लॅन पेनने लिहीण्यात आलेला होता. हा कागद आता एटीएसच्या हाती लागला आहे. तसेच यासोबतच अॅल्युमिनीयमचे पाईप, काच आणि बुलेट्स देखील घरातील सिलींगमध्ये सापडल्या आहेत, एबीपी माझाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

कोथरूड येथून केली होती अटक

पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथील बधाई चौकातून आरोपी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान (वय २३) आणि मोहम्मद युनुस मोहम्मद याकुल साकी (वय २४, दोघेही रा. ए/१, बिल्डींग फ्लॅट क्रमांक १७, चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा. मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना अटक केली होती.

तपासादरम्यान दोन्ही अटकेत असलेले आरोपी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडील गुन्ह्यात फरारी असल्याचे आणि त्यांच्याविरुध्द प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याची माहिती समोर आली होती.

दरम्यान यापूर्वी कोंढवा येथील घरातून लॅपटॉप, टॅब, वजनकाटा, ड्रोन, नकाशा, बॅटरीसेल, इलेक्ट्रॉनिक्स सोल्डरींग गन, केमिकल पावडर व वेगवेगळी उर्दू व अरेबिक भाषेतील पुस्तके असे साहित्य जप्त करण्यात आले होते.

आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली पावडर तज्ज्ञांकडून तपासली असता ती स्फोटक पदार्थ असल्याबाबत प्राथमिक अहवाल प्राप्त झाला. तसेच, या आरोपींनी जंगल परिसरात राहण्यासाठी घेतलेले तंबूही जप्त करण्यात आले आहेत.

कोंढवा परिसरात हे दोघे मागील दिड वर्षांपासून राहत होते. तसेच या दोघांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूरातील जंगलात बॉम्बची चाचणी देखील घेतली होती, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT