Corona_Patient
Corona_Patient 
पुणे

पुण्यात दिवसभरात आढळले तीन हजार नवे कोरोना रुग्ण; मृतांची संख्याही वाढली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.१२) दिवसभरात २ हजार ९९७ नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील सर्वांधिक १ हजार ५८४ जणांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात ६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ  पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २४,  जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २४५, नगरपालिका क्षेत्रात ६६ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ७८ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख १५ हजार १२८ झाली आहे. यापैकी ८६ हजार ८१७ रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. यामध्ये आजच्या दिवसभरातील २ हजार १७२ रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही मंगळवारी (ता. ११) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता. १२) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. बुधवारी मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २८ जण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील १५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ९, नगरपालिका कार्यक्षेत्रातील ११ आणि कॅंंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील चार रुग्णांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT