pune 4 dam water level half tmc water storage rain monsoon weather update sakal
पुणे

Pune Dam Water Level : चार धरणात मिळून, अर्धा टीएमसीची वाढ

खडकवासला धरण साखळीत मागील आठवड्यात कमी अधिक प्रमाणात पावसाला सुरवात झाली

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला धरण साखळीत मागील आठवड्यात कमी अधिक प्रमाणात पावसाला सुरवात झाली. या चार- पाच दिवसात सुमारे चार ही धरणात मिळून अर्धा टीएमसीची वाढ झाली आहे.

वरसगाव धरणातून वीज निर्मितीसाठी ६०० क्युसेकचा विसर्ग सुरु होता. वरसगाव धरण आज गुरुवारी दुपारी बारा वाजता १०० टक्के भरले. त्यातून ५९७ क्युसेक पाणी सांडव्यातून मोसे नदीत सोडले. वरसगाव मधून एकूण एक हजार १९७ क्युसेक पाणी सोडले आहे.

अशाच प्रकारे पानशेत धरणातून वीज निर्मितीसाठी ६०० क्युसेकचा विसर्ग सुरु होता. पानशेत धरण आज गुरुवारी १०० टक्के भरले. त्यातून संध्याकाळी सात वाजता ६८३ क्युसेक पाणी सांडव्यातून अंबी नदीत सोडले. पानशेतमधून एकूण एक हजार २८३ क्युसेक पाणी सोडले आहे. तसेच, टेमघर धरणातून ३५० क्युसेकचा विसर्ग वीज निर्मितीसाठी सुरु आहे.

गुरुवारी सकाळी सहा वाजता संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला येथे किरकोळ पाऊस झाला. पानशेत येथे दोन, वरसगाव येथे एक, टेमघरला पाच मिलिमीटर पाऊस पडला आहे. दरम्यान, आज अखेर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात १.१२ टीएमसी म्हणजे ५६.८२ टक्के पाणीसाठा आहे.

पानशेत मध्ये १०.६५ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणी जमा झाले आहे. वरसगाव धरणात १२.८२ टीएमसी १०० टक्के धरण भरले आहे. तर टेमघर धरणात २.८२ टीएमसी म्हणजे ७५.९७टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर चारही धरणात २७.४१ टीएमसी म्हणजे ९४.०२ टक्के धरण भरलेले आहे.

पानशेत मधून एक हजार २८३ क्युसेक, वरसगाव मधून एकूण एक हजार १९७ क्युसेक व टेमघर मधून ३५० क्युसेक पाणी सोडले आहे. या तिन्ही धरणातून सोडलेले दोन हजार ८२० क्युसेक पाणी खडकवासला धरणात जमा आहे. तर खडकवासला धरणातून शेतीसाठी १००५ क्युसेक पाणी सोडले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: तमिळनाडूमध्ये सत्तेचा मोठा खेळ उलटला? विजयच्या पक्षाने सर्वांनाच दिला धक्का

Vijay Thalapathy TVK Party : विजय थलपथीचा तामिळनाडूच्या राजकारणात 'मास्टर' स्ट्रोक! पहिल्याच निवडणुकीत मोठी आघाडी

Pune Crime : पुण्यात सासऱ्याकडून सुनेची हत्या, ६ महिन्यांच्या बाळासमोरच भिंतीवर डोकं आपटलं अन्...

Tamil Nadu Election Result Update : लाडक्या बहिणींनी विजय थलपतीला तारलं, लग्नात मुलींना मिळणार आता ८ ग्रॅम सोने; थलपतीचा महाराष्ट्र पॅटर्न चर्चेत

Nagpur News: ट्रांझिट बेलनंतरही अटकपूर्व जामिनाचा हक्क नाही; उच्च न्यायालय : बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणात डॉ. सिंगला दणका

SCROLL FOR NEXT