election 
पुणे

पुणे: जिल्हा परिषदेच्या 4 तर पंचायत समितीच्या 6 सदस्यांची पदे रद्द

सकाळ वृत्तसेवा

महापालिकेमध्ये २३ गावे समाविष्ट करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने दिला आहे. यामुळे या गावांमधून जिल्हा परिषदेच्या गटांतून निवडून आलेले चार सदस्य आणि हवेली तालुक्‍यातील पंचायत समितीच्या गणातील सहा सदस्यांचे पद रद्द होणार आहेत.

पुणे- महापालिकेमध्ये २३ गावे समाविष्ट करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने दिला आहे. यामुळे या गावांमधून जिल्हा परिषदेच्या गटांतून निवडून आलेले चार सदस्य आणि हवेली तालुक्‍यातील पंचायत समितीच्या गणातील सहा सदस्यांचे पद रद्द होणार आहेत. (Pune 4 posts of Zilla Parishad and 6 posts of Panchayat Samiti canceled)

महापालिकेच्या हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्यापूर्वी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१च्या कलम २५७ नियमानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांचे पद रद्द करावे लागेल. संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यापूर्वी संबंधितांना सुनावणीची संधी देण्यात येते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांपूर्वी या सदस्यांची सुनावणी घेतली होती. त्यामध्ये काही सदस्यांनी आमचे सदस्यत्व रद्द करु नये. कार्यकाल आहे तोपर्यंत पद कायम ठेवावे, अशी मागणी केली. तर काही सद‌स्यांनी गावे समाविष्ट होणाऱ्या निर्णयाचे स्वागत केले. उपस्थित सदस्यांनी केलेला युक्तिवाद तसेच लेखी म्हणणे जिल्हा प्रशासनाकडून सरकारला पाठविण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण १० सदस्यांशी पद रद्द झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सदस्यत्व रद्द झालेला

जिल्हा परिषदेचा गट

गट क्रमांक ४१, मांजरी बुद्रूक-शेवाळवाडी, गट क्रमांक ४४ आंबेगाव बुद्रूक-नऱ्हे, गट क्रमांक ४५ धायरी-नांदेड, गट क्रमांक ४२ केशवनगर-साडेसतरानळी.

पंचायत समितीचा गण

गण क्रमांक ८२ शेवाळवाडी, गण क्रमांक ८७ आंबेगाव बुद्रूक, गण क्रमांक ८८ नऱ्हे, गण क्रमांक ८९ धायरी, गण क्रमांक ९० नांदेड, गण क्रमांक ८४ साडेसतरानळी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT