Pune 
पुणे

Pune: सिलेंडरचा स्फोट झाल्याने सातारा रस्त्यावरील ४ ते ५ दुकानांना भीषण आग

सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग

धनश्री ओतारी

सातारा रस्त्यावर डी मार्ट नजीक मध्यराञी ०२•२२ वाजण्याच्या सुमारास ४ ते ५ दुकानांना भीषण आगीची घटना घडली. सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Pune 4 to 5 shops on Satara road caught fire due to cylinder explosion)

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा रस्त्यावर डी मार्ट नजीक मध्यराञी ०२•२२ वाजता आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली. दलाकडून ०६ फायरगाड्या ०२ वॉटर टँकर व ०१ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या.

घटनास्थळी ०३ दुकानांमधे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. 1) दुकान होम अप्लायन्स 2) दुकान किचन अप्लायन्स व 3) दुकान मोबाईल शॉपी अशी दुकाने होती. घटनास्थळी गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी अशा अनेक प्रकारच्या वस्तु होत्या.

याठिकाणी आग लागून स्फोट झाल्याने दोन मजली इमारतीत मोठी पडझड झाली आहे. स्फोट इतके मोठे होते की, दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य पलीकडील रस्त्यावर पडले होते. एक दुचाकी पुर्ण जळाली आहे.

भीषण आगीत दोन नागरिक जखमी झाले असून यामधे एक इसम दुकानाचा मालक असल्याचे स्थानिकांकडून समजते. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणली असून धोका दूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT