Corona-Patients
Corona-Patients 
पुणे

पुणे : दिवसभरात सापडले नवे 59 कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्येने ओलांडला 500 चा टप्पा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून शुक्रवारी (ता.१७) दिवसभरात नवे 59 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येने पाचशेचा आकडा ओलांडला असून, एकूण रुग्ण संख्या 501 झाली आहे. गंभीर बाब म्हणजे, 10 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 47 पर्यंत गेला आहे. मात्र, 4 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरीही सोडले आहे. 

लोहियानगरमधील 44 वर्षाच्या पुरुषाला 13 एप्रिलला रुग्णालयांत दाखल केले होते. त्यांना कोरोना झाल्याने गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते; दरम्यान शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला असून त्यांना हृदयाचा त्रास होता. 

गुलटेकडीतील 50 वर्षाच्या पुरुषाचाही मृत्यू झाला असून, त्यांना 12 एप्रिला दाखल केले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी जाहीर केले. त्यांना उच्चरक्तदाब, मधुमेहचा त्रास होता. 

कोरोनाला रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. घरोघरी जाऊन तपासणी करतानाच सील केलेल्या भागांतील लोकांत कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून आली तरी त्यांना थेट विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येत आहे. त्याचवेळी काही लोकांचे घरीच स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. तसेच, क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर नवी पथके नेमली असून, फ्लू क्‍लिनिकही सुरू करण्यात आले आहेत.

दुसरीकडे, पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 586 झाली असून, 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 68 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

पुणे जिल्ह्यात 531 कोरोना बाधित रुग्ण असून, 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 11 बाधित रुग्ण असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 12 बाधित रुग्ण आढळले असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 26 रुग्ण आणि कोल्हापूर जिल्ह्यात 6 बाधित रुग्ण आहेत.

नमुना तपासणी अहवाल 
विभागामध्ये आजपर्यंत 7 हजार 289 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 6 हजार 937 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर, 386 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 6 हजार 306 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह असून, 586 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

घरांचे सर्व्हेक्षण
आजपर्यंत विभागामधील 37 लाख 41 हजार 75 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 1 कोटी 43 लाख 58 हजार 694 व्यक्तींची तपासणी केली आहे. विभागात एकूण 5 हजार 660 नागरिकांना निरिक्षणाखाली होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 4 हजार 227, सातारा जिल्ह्यात 274, सोलापूर जिल्ह्यात 991, सांगली जिल्ह्यात 167 आणि कोल्हापूर जिल्ह्यात एका व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

संस्थात्मक क्वारंटाईन 
पुणे विभागात एकूण 2 हजार 310 नागरिकांना निरिक्षणाखाली संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 244, सातारा जिल्ह्यात 135, सोलापूर जिल्ह्यात 653, सांगली जिल्ह्यात 81 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 197 नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT