esakal | 'डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच औषधे द्या, नाहीतर...'; उपमुख्यमंत्र्यांचे औषध विक्रेत्यांना आदेश!
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit-Pawar

पुणे शहर व जिल्ह्यात १ मार्चपासून नोंदणीकृत डॉक्टरच्या प्रिस्क्रिपनशिवाय औषधे विक्रीस बंदी घालण्यात आलेली आहे. शिवाय जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार तपासणी पथके स्थापन केली आहेत.

'डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच औषधे द्या, नाहीतर...'; उपमुख्यमंत्र्यांचे औषध विक्रेत्यांना आदेश!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात सध्या कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नोंदणीकृत डॉक्टरच्या परवानगीशिवाय सर्दी, ताप, खोकला आणि अंगदुखीची औषधांची विक्री करण्यास राज्य सरकारने बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला दिला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यामुळे पुणेकरांनो, आजारी पडलात तर, थेट औषधे विक्रेत्यांकडे न जाता उपचारासाठी पहिल्यांदा  जवळच्या सरकारी रुग्णालयात किंवा नोंदणीकृत डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर त्यांनी लिहून दिलेली औषधेच घ्यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

- 'धमक्यांना घाबरायला मी झायरा वसीम नाही'; बबिता फोगटचे जोरदार प्रत्युत्तर

सर्दी, ताप, खोकला झाला की, नागरिक दवाखान्यात न जाता परस्परच या आजारांवरील औषधांची औषधे दुकानातून खरेदी करत असल्याच्या तक्रारी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे करण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पवार यांनी या औषधांची परस्पर विक्री न करण्याचा आदेश सर्व औषध विक्रेत्यांना द्यावा, अशी सूचना राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाला केली होती.

- 'कोविड-19'च्या संशोधनासाठी वापरणार 'सीएसआर' फंड; 'बीरेक'चा निर्णय!

याबाबत अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना पत्र देण्याचा आदेशही सचिव राजीव जाधव यांना दिला होता. त्यानुसार जाधव यांनी तसे पत्र अन्न व औषध आयुक्तांना पाठवले आहे. पुणे शहर व जिल्ह्यात १ मार्चपासून नोंदणीकृत डॉक्टरच्या प्रिस्क्रिपनशिवाय औषधे विक्रीस बंदी घालण्यात आलेली आहे. शिवाय जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार तपासणी पथके स्थापन केली आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांच्या आदेशानुसार आज पुन्हा शहरातील सर्व औषधे विक्रेत्यांना आणि त्यांच्या संघटनांना पत्र दिल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे (पुणे दोन १) सहायक आयुक्त राजेश चौधरी यांनी सांगितले.

- आरबीआयकडून ५०हजार कोटींचे पॅकेज जाहीर; लघु आणि मध्य उद्योगांना दिलासा

... अन्यथा औषध विक्रेत्यावर कारवाई

पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व औषधे विक़ेत्यांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे. अन्यथा यांचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही राजेश चौधरी यांनी दिला आहे.