junnar
junnar sakal
पुणे

Pune: एसटी बसमध्ये जागा पकडणे महिलेच्या आले अंगलट

दत्ता म्हसकर

जुन्नर : येथील नवीन एसटी बसस्थानकात एसटी बसमध्ये जागा धरण्याची शक्कल जळवंडी ता.जुन्नर येथील महिलेला चांगलीच महागात पडली.गणेशोत्सवयाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी ता.९ रोजी दुपारी ही घटना घडली. गणेश स्थापनेमुळे एसटी बस स्थानकावर विविथ ठिकाणी जाणाऱ्यांची मोठी गर्दी होती.

बस मध्ये बसून प्रवास करावा अशी प्रत्येक प्रवाशाची इच्छा असते. यातून बस मध्ये जागा मिळविण्यासाठी अनेक युक्त्या वापरल्या जातात कोणी चालकाच्या दरवाजातून तर काही पाठीमागील खिडकीतून आत प्रवेश करत असतानाचे चित्र गर्दीच्या वेळी हमखास पहावयास मिळते. काही जण खिडकीतून सीटवर रुमाल,टोपी,बॅग,पिशवी टाकून जागेचा हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात.

जुन्नर-देवळे एसटी बस मध्ये गर्दीमुळे असाच काही प्रकार सुरू होता. जळवंडी येथील राजश्री नागेश सोनवणे या महिलेने खिडकीतून आपली पिशवी सीटवर टाकून आपली जागा आरक्षित केली मात्र दरवाजातून आत जात सीटवर असणारी पिशवी त्यांनी हातात घेतली यावेळी त्यातील आपला दहा हजार रुपगे किमतीचा विवो कंपनीचा वाय ५१ मोबाईल फोन गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

याबाबत त्यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची फिर्याद दिली असून जुन्नर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी दिली. जुन्नर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

Latest Marathi News Update : नाशिकमध्ये कपालेश्वर हॉटेलच्या मागच्या बाजूला आग

World Athletics Relays : भारतीय महिला अन् पुरुष संघाची रिलेमध्ये दमदार कामगिरी, आता ऑलिम्पिक पदकासाठी पॅरिसमध्ये धावणार

SCROLL FOR NEXT