Pune Accident sakal
पुणे

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

कल्याणीनगरमधील पोर्श मोटार अपघात प्रकरण ताजे असतानाच शहरात ‘रॅश ड्रायव्हिंग’च्या घटना सुरूच आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कल्याणीनगरमधील पोर्श मोटार अपघात प्रकरण ताजे असतानाच शहरात ‘रॅश ड्रायव्हिंग’च्या घटना सुरूच आहेत. सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गात भरधाव मोटार घुसवून बॅरिकेड॒स उखडून टाकल्याची घटना गुरुवारी (ता. ३०) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी उत्तम वसंत पारखे (वय ५०, रा. धनकवडी) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सिद्धांत खेमचंद भाकरे (वय २४, रा. स्वारगेट पोलिस वसाहत) या संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाकरे हा पहाटे सातारा रस्त्यावरील सिटी प्राइड चौकातून स्वारगेटच्या दिशेने निघाला होता. पर्वती इंडस्ट्रिअल एरियाच्या कमानीच्या समोर बीआरटी मार्गात त्याने निष्काळजीपणे आणि धोकादायक पद्धतीने मोटार चालवून बॅरिकेड॒सला धडक दिली. त्यात बॅरिकेड॒स आणि त्याच्या मोटारीचे असे सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिस हवालदार पी.पी. जगताप करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

W,W,W,W,W! अर्शदीप सिंगचा तिखट मारा, प्रतिस्पर्धी झाला कावराबावरा; न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी ठोकला दावा, पण मिळणार नाही संधी

Leopard Attack Boy : थरारक! बिबट्याने दुचाकीस्वाराचा केला पाठलाग, कुत्रा असेल म्हणून गाडी हळू घेतली अन्...

Latest Marathi News Live Update : आम्ही आरोप केले तर अडचण होईल, भाजपचा अजितदादांना इशारा

१२ जानेवारीपासून कलर्स मराठीवर मोठे बदल; ४ मालिकांची वेळ बदलली, तर 'ही' गाजलेली मालिका घेणार निरोप

Mustafizur Rahman बाबत फैसला झाला, बीसीसीआयने KKR ला स्पष्टच सांगितले; पण, बांगलादेशी खेळाडूला द्यावे लागणार ९.२० कोटी?

SCROLL FOR NEXT