Pune Accident sakal
पुणे

Pune Accident : मोटारीच्या धडकेत हवालदाराचा मृत्यू;पुण्यात ‘हिट अँड रन’चे आणखी एक प्रकरण

रात्रपाळीत दुचाकीवरून गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना भरधाव मोटारीने धडक दिल्याची घटना रविवारी मध्यरात्री बोपोडीतील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भुयारी मार्गाजवळ घडली. त्यात हवालदाराचा मृत्यू झाला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रात्रपाळीत दुचाकीवरून गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना भरधाव मोटारीने धडक दिल्याची घटना रविवारी मध्यरात्री बोपोडीतील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भुयारी मार्गाजवळ घडली. त्यात हवालदाराचा मृत्यू झाला; तर शिपाई गंभीर जखमी आहे. पोलिसांनी कारचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

कारचालक मद्याच्या नशेत असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्याने रात्रीची रपेट मारण्यासाठी गाडी मित्राकडून घेतली होती. हवालदार समाधान आनंदराव कोळी (वय ४४, रा. बोपोडी, मूळ चोपडा, जि. जळगाव) यांचा अपघातात मृत्यू झाला; तर शिपाई संजोग श्याम शिंदे (वय ३५) जखमी झाले आहेत. या प्रकरणी कारचालक सिद्धार्थ ऊर्फ गोट्या राजू केंगार (वय २४, रा. बोपोडी) याला अटक केली आहे. त्याच्याबरोबर गाडीत आणखी कोण होते? याचा तपास सुरू आहे. ही घटना रविवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास बोपोडीतील आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या अंडरपासजवळ घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळी आणि शिंदे खडकी पोलिस ठाण्यात नियुक्तीस होते. रात्रपाळीत दोघे दुचाकीवरून (बीट मार्शल) गस्त घालत होते. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ते बोपोडी चौकातून दुचाकीवरून रेल्वे पुलाकडे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. त्यात कोळी आणि शिंदे जखमी झाले. कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र उपचारापूर्वी कोळी यांचा मृत्यू झाला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अपघाताच्या ठिकाणी आणि रुग्णालयास भेट दिली. तसेच त्यांनी कोळी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

‘‘अपघातानंतर वाहनचालक फरार झाला होता. पोलिस तपासात काही संशयित वाहने निष्पन्न झाली होती. त्याचा सविस्तर तपास करून वाहन जप्त केले आहे. शिंदे यांची तब्येत चांगली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या बाबत वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे.’’

- प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT