पुणे

जखमी महिलेला मिळणार ११ लाख

CD

पुणे, ता. ९ ः अपघातात १० टक्के अपंगत्व, उपचारासाठी साडेपाच लाख रुपये खर्च आलेल्या महिलेला ११ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय लोकअदालतीमध्ये झाला.
५३ वर्षीय सुरेखा (नाव बदलले आहे) यांना ही नुकसान भरपाई मिळाली. त्या १४ मार्च २०२४ रोजी एसटी बसने पुण्यातून मुंबईला चालल्या होत्या. त्यावेळी पुनावळे परिसरात समोरून आलेल्या टेम्पोने एसटीला जोरदार धडक दिली. त्यात त्या जखमी झाल्या. त्यांच्या पायाला अपंगत्व आले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारासाठी साडेपाच लाख रुपये खर्च आला. या पार्श्वभूमीवर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी त्यांनी ॲड. प्रज्वल गुंजाळ यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायाधिकरणात दावा दाखल केला. आयसरचे मालक आणि विमा कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्डच्याविरोधात हा दावा दाखल केला होता. प्रलंबित असताना हा दावा तडजोडीसाठी लोकअदालतीत ठेवण्यात आला. तेथे ही तडजोड झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, बैठकांना सुरुवात; 'हे' 5 मुद्दे गाजणार

रेल्वे पुनर्वसन प्रकल्पासाठी जागा मोकळी करणे आवश्यक; गणेश नगर-मेघवाडी कारवाईवर DRP चं स्पष्टीकरण

Mrunal Thakur Yashasvi Jaiswal Dating Rumours: यशस्वी जैस्वालसोबत डेटिंगच्या चर्चांवर मृणाल ठाकूरचं मौन अखेर तुटलं; म्हणाली, “Gen Z...”

Solar Scheme Scam: पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या नावाखाली १२ लाखांहून अधिकांची फसवणूक; राजेंद्र बोहाडेवर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

गोकुळकडून दूध उत्पादकांना मोठा दिलासा; म्हैस अन् गाय दूध खरेदी दरात वाढ

SCROLL FOR NEXT