accident  sakal
पुणे

Pune : मालवाहू ट्रकला अपघात; अग्निशमन दलाकडून जखमी दोघांची सुटका

अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन दलाकडून करून याना ससून रुग्णालयात रवाना करण्यात आले.

शीतल बर्गे.

बालेवाडी : बाणेर येथील मुंबई-बंगलूर महामार्ग, सुस खिंड, महिंद्रा शोरूम समोर ता.५ , सकाळी ६.३० च्या दरम्यान दोन मालवाहू ट्रकचा अपघात होऊन, दोन व्यक्ती जखमी अवस्थेत अडकलल्या . या जखमिंची सुटका पाषाण अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन दलाकडून करून याना ससून रुग्णालयात रवाना करण्यात आले.

बाणेर येथील मुंबई- बंगलुर महामार्ग, सुस खिंड, महिंद्रा शोरूम समोर ता.५ , सकाळी ६.३० च्या दरम्यान रस्त्यावर कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मुंबईकडून साताराकडे जाणाऱ्या मार्गावर मागील बाजूने दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने अपघात होऊन वाहनचालक व सोबत असलेला कर्मचारी यांचे दोन्ही पाय पुढे अडकल्याने ते जखमी झाले.

त्याचवेळी दलाच्या जवानांनी तत्परतेने अग्निशमन बचाव साहित्याचा (बोल्ड कटर, स्पेडर, डोअर ब्रेकर, कटावणी,रश्शी इत्यादी) वापर करुन सुमारे वीस मिनिटात दोन ही जखमींना बाहेर काढून तातडीने दोन रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात रवाना केले. जखमींच्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असून दत्तू आंबू गोळे ,(वय ६०) व सुरज सुर्वे,(वय ३० )अशी यांची नावे असून हे सातारा भागातील रहिवाशी असल्याची माहिती

या कामगिरीतील अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे यांनी दिली. यावेळी वाहनचालक लतेश चौधरी व तांडेल विष्णू राऊत आणि जवान ज्ञानदेव गोडे, अब्दुल पटेल, सुरेश इष्टे तसेच मदतनीस जवान औंकार देशमुख, विकास कुटे यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT