अपघात sakal
पुणे

Pune Accident : हडपसर-सासवड रस्ता अपघातात स्वच्छता कर्मचारी महिलेचा जागीच मृत्यू

सासवड रस्ता पदपथालगत साफसफाई करीत असताना मोटारीने धडक देऊन झालेल्या अपघातात

कृष्णकांत कोबल

हडपसर : सासवड रस्ता पदपथालगत साफसफाई करीत असताना मोटारीने धडक देऊन झालेल्या अपघातात पालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला. छाया भजनदास शिंदे (वय ४५, रा. विशाल झोपडपट्टी, आकाशवाणी, हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. आज (ता. ५) सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

छाया शिंदे या पालिकेच्या सातववाडी आरोग्य कोठीकडे कंत्राटी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करीत होत्या. हडपसर-सासवड महामार्गावर सातववाडी जवळ त्या नेहमीप्रमाणे झाडलोट करीत होत्या. त्यावेळी सासवडकडे जाणाऱ्या एका खासगी प्रवासी मोटारीने पदपथावरील वडाच्या झाडाला धडक देऊन पुढे स्वच्छतेचे काम करणाऱ्या छाया यांना धडक देऊन फरपटत नेले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अधिक तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT