पुणे

टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

CD

पुणे, ता. १७ : पुणे- अहिल्यानगर रस्त्यावरील केसनंद फाटा येथे रविवारी सकाळी भरधाव टेम्पोच्या धडकेत एका २० वर्षीय पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरफात इसतियाक अन्सारी (वय २०, रा. संत तुकारामनगर, केसनंद फाटा, वाघोली) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे मामा आसिफ नासीर अन्सारी (वय ४२) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरफात रविवारी (ता. १६) सकाळी सव्वापाचच्या सुमारास केसनंद फाटा चौकातून जात असताना एका भरधाव टेम्पोने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने अरफातचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅफे फ्लाईंग जिप्सी प्रकरण! साताऱ्यात वाद, पुण्यात जीवघेणा हल्ला, प्रसिद्ध रिलस्टारसह सात जणांना अटक

सचिन आणि माझ्यात आधी मैत्री नव्हती... अशोक सराफ यांचा चकीत करणारा खुलासा; म्हणाले- मी त्याच्या वडिलांना...

इन्स्टाग्रामवर ओळखीनंतर भेटायला बोलावलं, बंद खोलीत नेत अल्पवयीन मुलांचं १४ वर्षीय मुलीसोबत घाणेरडं कृत्य; नालासोपाऱ्यात काय घडलं?

Marathi News Live Updates : आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा निर्णय मागे घेण्याची मागणी

अमित मालवीय यांना हटवलं, भाजपच्या IT सेलची कमान आता केमिस्ट्री प्राध्यापकाच्या हाती, कोण आहेत दीपक म्हस्के?

SCROLL FOR NEXT