pune accident news container crushed students One killed two injured aTalegaon Dabhade sakal
पुणे

Pune Accident News : भरधाव कंटेनरने पायी जाणा-या विद्यार्थ्यांना चिरडले

तळेगाव दाभाडे येथील अपघातात एक ठार,दोन जखमी

सकाळ वृत्तसेवा

तळेगाव स्टेशन : तळेगाव-चाकण महामार्गावर वडगाव फाट्यानजीक भरधाव कंटेनरने दुचाकीला ठोकर मारुन,पायी चाललेल्या तिघांना चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.दुचाकीस्वार मात्र अपघातात बालंबाल बचावले.

गुरुवारी (ता.०२) रात्री साडेदहाच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील स्वराज नगरीसमोर झालेल्या या अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गासह,तळेगाव-चाकण महामार्गावर बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती.

चिरडलेले तिघे जण विद्यार्थी हे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात होऊ घातलेल्या बाईक रॅलीत सहभागी होण्यासाठी आले होते.पैकी मयत हा तामिळनाडू राज्यातील असल्याचे समजते.चाकणहून मुंबईकडे चाललेल्या कंटेनर क्रमांक एम एच ४८ बीएम-३५६० ने दुचाकी क्रमांक एम एच-१४ एजे-३२०७ ला धडक दिली.

त्यानंतर झाडाला धडकून पुढे पायी चाललेल्या विद्यार्थ्यांना चिरडल्यानंतर वळन घेत,रस्त्यावर आडवा होत विरुद्ध दिशेला जाऊन मातीच्या ढिगा-यावर जाऊन धडकला.अपघातानंतर चालक पळून गेला. गंभीर जखमींपैकी एकावर नागरे हाॅस्पीटल तर दुसर्‍यावर सोमाटणे येथील स्पर्श हाॅस्पीटलमधे उपचार चालू आहेत.

तळेगाव दाभाडे आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यांच्या नेमक्या हद्दीवर झालेल्या या अपघाताची माहीती कळताच दोन्ही पोलीस ठाण्यांसह वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी पोहोचत कंटेनर बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: नाइन्टी मारली अन् अंगात आणली... PMPL बस अडवली! पुण्यातील मद्यपीचा व्हिडिओ व्हायरल

Farmers Desperate : 'दर पडल्याने शेपू, कोथिंबिरीवर फिरविला रोटावेटर'; शेतकरी हतबल, भाजीपाला उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

Latest Marathi News Updates : अमरावतीमध्ये आरोग्य परिचारिकांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन

Maharashtra ITI: शासकीय आयटीआय देणार ‘दत्तक’; कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे कार्यवाही

Solapur Crime : आगरवाल हल्लाप्रकरणी सहा जणांना पोलिस कोठडी; २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT