Pune Accident sakal
पुणे

Pune Accident : नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात ! ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले, चार वाहने एकमेकांना धडकली

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी होती. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

विठ्ठल तांबे

Pune - धायरी : मुंबई - बंगळुरू महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात झाले. ४ चारचाकी वाहनांचे नुकसान झाले असून हा अपघात रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळ घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कोल्हापूरहून गुजरातकडे साखर घेऊन निघालेला ट्रक नऱ्हे हद्दीतील सेल्फी पॉइंट जवळ आला. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यात ट्रकची समोर असलेल्या कारला धडक बसली. त्यामुळे समोर असणारी तीन वाहने एकमेकांना धडकली.

दरम्यान, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी होती. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघाताचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे तसेच पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदारानी  घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : 'गोकुळ'मधील गैरव्यवहाराची ‘ईडी’कडून चौकशी करा, आमदार शिवाजी पाटील यांची मागणी

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT