Pune Accident Sakal
पुणे

Pune Accident : शिवाई बसची कारला धडक देऊळगाव मही येथील युवकाचा मृत्यू

या घटनेमुळे देऊळगाव मही येथील समाजमन हेलावले आहे.

सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव मही - पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर येथे असणाऱ्या दर्ग्यावर दर्शनासाठी गेलेल्या देऊळगाव मही येथील युवकाचा अपघाती मृत्यू झाला. शिवई बसने कारला धडक दिल्याची घटना वाळूज पंढरपूर मार्गावर काल रात्री घडली होती.

अपघातग्रस्त कारमध्ये सदर युवक प्रवास करीत होता. सय्यद जावेद सय्यद हबीब (वय 25)रा. देऊळगाव मही असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे देऊळगाव मही येथील समाजमन हेलावले आहे.

येथील ग्रामपंचायत माजी उपसरपंच सय्यद सईद यांचे बंधू सय्यद जावेद हे पुणे जिल्ह्यातील खेड शिवापुर कमर अली दरवेश दर्ग्यावर दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परत येत असताना वाळूज पंढरपूर मार्गावर पाठीमागून येणाऱ्या महामंडळाच्या एमएच १२ व्ही.एफ ४०३४ क्रमांकाच्या शिवाई बसच्या चालका ने बेजबाबदार वाहन चालवत ब्रेझा कार एम एच २८ ए झेड ७५८६ जोरदार धडक दिली.

या अपघातात सदर कार तब्बल सत्तर ते ऐंशी फूट फरपटत गेली, हा अपघात भयंकर होता की ब्रेजा कारचे अक्षरशःचुराडा झाली. या अपघातात देऊळगाव मही येथील तरुण सय्यद जावेद याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. इतर चार जण गंभीर जखमी अवस्थेत संभाजीनगर येथे रुग्णालयात भरती करण्यात आले. सय्यद जावेद याच्या अपघाती मृत्यूने देऊळगाव मही परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT