Pune Accident 
पुणे

Pune Accident: जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा झटका; एकाचा मृत्यू, वडगाव शेरीतील घटना

Pune Electric shock News: एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. वडगाव शेरीतील आनंद पार्क येथे आज सकाळी ही घटना घडली आहे.

कार्तिक पुजारी

Pune Accident: पुण्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा झटका लागला आहे. यात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. वडगाव शेरीतील आनंद पार्क येथे आज सकाळी ही घटना घडली आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलूस वडगाव शेरीतील आनंद पार्क येथून जात होता. काही तरुण हातात झेंडा घेऊन डॉल्बीच्या वरती थांबले होते. वाहन पुढे जात असताना एका तरुणाचा धक्का ओव्हर हेड वायरला लागला. त्यामुळे विजेचा झटका बसून त्याचा जागीत मृत्यू झाला आहे. दुसऱ्या एका तरुणाला देखीव विजेचा झडका बसला आहे. तो गंभीर जखमी झाला आहे.

तरुणांना विजेचा झटका बसल्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. एक तरुण वायरला चिटकून बसला होता, तर दुसरा खाली पडला होता. दुसऱ्या तरुणाला बेशुद्ध अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तरुणांना उंचीवर ओव्हरहेड वायर असल्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे हा अपघात घडला असल्याचं सांगण्यात येतंय. सदर प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT