Pune 
पुणे

हद्द झाली! चोरट्यांनी पुण्याच्या एसीपींचा किंमती श्वान पळवला; अन्...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर पोलिस दलातील एका सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या (एसीपी) कुटुंबीयांनी पाळलेला परदेशी श्‍वान बंगल्याबाहेर पडला. किंमती श्‍वान रस्त्याने एकटाच पळताना पाहून चोरट्यांनी त्याला पळविला. बराच शोध घेऊनही श्‍वान काही सापडेना, अखेर श्‍वान हरवल्याची लष्कर पोलिसात तक्रार दाखल झाली. शेवटी 'एसीपी' साहेबांचाच श्‍वान म्हटल्यावर, लष्कर पोलिसांनी दिवसरात्र एक करीत, सीसीटीव्ही फुटेज तपासून अखेर चोरट्यांचा माग काढला. मोठ्या तत्परतेने श्‍वानाची शोधमोहीम फत्ते करून श्‍वानाला 'एसीपीं'च्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केले, तर चोरट्यांना बेड्या ठोकून पोलिस ठाण्यात आणले. 

सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी हे लष्कर परिसरातील शासकीय निवासस्थानात राहतात. त्यांच्या कुटुंबीयांनी अमेरीकन बुलडॉग या प्रजातीमधील श्वान पाळला आहे. गुरुवारी त्यांच्या निवासस्थानाच्या आवारातून त्यांचा श्‍वान बाहेर पडला. श्‍वान थेट मुख्य रस्त्याने जात होता. त्याचवेळी दुचाकीवरुन जाणाऱ्या चोरट्यांनी श्‍वानाला पाहिले, परदेशी श्‍वान असल्याने चोरट्यांनी श्‍वानाला दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदाराने चोरुन नेले. दरम्यान, चौधरी यांच्या कुटुंबीयांनी श्‍वानाचा निवासस्थानाबरोबर अन्य ठिकाणीही शोध घेतला, मात्र त्यांना श्‍वान आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी अखेर लष्कर पोलिसांकडे तक्रार दिली. लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनमीत राऊत, महाडिक यांनी तत्काळ तपास सुरू केला.

लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यामध्ये दुचाकीस्वारांनी श्‍वानाला पळविल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी पोलिस हवालदार कैलास चव्हाण यांना चौधरी यांचा श्वान हडपसर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आरोपींची माहिती काढल्यानंतर दोन्ही आरोपी सराईत चोरटे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हडपसर परिसरात जाऊन चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी श्‍वानाला त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीकडे ठेवले होते. त्यानंतर त्या व्यक्तीकडून श्‍वानाला घेऊन चौधरी कुटुंबीयांकडे सुपुर्द केले. त्यानंतर चोरट्यांना अटक करुन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

...अशीच तत्परता गुन्हे रोखण्यातही दाखवावी!

पोलिसांनी 'एसीपीं'च्या श्‍वानाचा शोध अतिवेगाने घेतल्याची बातमी सगळीकडे पसरल्यानंतर त्यावरुन चांगलीच चर्चा रंगली. विशेषत: श्‍वानाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जितकी तत्परता दाखविली, तितकीच तडफ शहरातील सोनसाखळी चोरी, घरफोडी, जबरी चोरीपासून अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यातही दाखवावी. सराईत गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्यातही दाखवावी, असे खास पुणेरी टोमणेही लगावण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Satara Highway : पुणे-सातारा मार्गावर ट्रक उलटला, खंडाळा ते केसर्डीपर्यंत वाहनांच्या रांगा

T20 WC : फायनल सोडा, पाकिस्तानचे उपांत्य फेरीत पोहोचणे अवघड झाले; न्यूझीलंडविरुद्धची लढत रद्द झाल्याने गणित बिघडले

Holi 2026 Puranpoli Recipe: डायबेटीजमुळे होळीला मिस करताय पुरणपोळी? साखर आणि मैद्याशिवायची स्वादिष्ट रेसिपी नोट करा

Buldhana : चिखला गावात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना, शिवभक्तांनी शनिवारी रात्री बसवला पुतळा; पाहा VIDEO

Latest Marathi News Live Update : गोव्यासाठी आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस

SCROLL FOR NEXT