pune action against IT cellwho viral video clip of Gaja marane  
पुणे

सावधान : गजा मारणेच्या व्हिडिओला लाईक करणारेही पोलिसांच्या रडारवर

सकाळवृत्तसेवा

पुणे : कारागृहातून सुटलेला गुंड गजा मारणे याची शेकडो वाहनांच्या ताफ्याच्या मिरवणुकीची व्हिडीओ क्‍लिप तयार करून ती सोशल मिडीयावर व्हायरल करीत, दहशत निर्माण केल्याप्रकरणी मारणे व त्याच्या टिमविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, मारणेचा व्हिडीओ युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम अशा सोशल मिडीयाद्वारे पसरविणाऱ्यांसह त्यास प्रतिसाद देऊन प्रतिक्रीया देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. 

पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा

मारणे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या खुनाच्या प्रकरणामध्ये न्यायालयाने त्याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी दोनशे वाहनांच्या ताफ्यातून त्यास मुंबईहून पुण्यात कोथरूड येथे आणले. त्यावेळी त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर धुडगुस घातला, त्याचबरोबर त्या मिरवणुकीचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणही करण्यात आले. त्यामुळे मारणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध खालापूर, शिरगाव, वारजे, कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. मारणेच्या साथीदारांनी वापरलेल्या अलिशान गाड्या, ड्रोन कॅमेरा पोलिसांनी जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, मारणे आणि त्याच्या साथीदारांनी फेसबुक, युट्युब, इन्स्टाग्रामवर मिरवणुकीचे व्हिडीओ व्हायरल करून करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात मंगळवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मारणे आणि साथीदारांविरोधात आणखी सात गुन्हे दाखल असून ते न्यायालयात प्रलंबित आहेत. या खटल्यातील साक्षीदार आणि तक्रारदारांवर दबाब निर्माण केल्याने त्याच्या विरोधात दाखल असलेल्या खटल्यात दोषमुक्त झाला. उच्च न्यायालयाने साक्षीदारांवर दबाब आणता येणार नाही, असे निवाडे दिले आहेत. मारणे याचे दहशत निर्माण करण्याचे कृत्य न्यायनिवाडे आणि मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारे आहे. एखादा गुंडाने समाजात दहशत निर्माण करण्यासाठी व्हिडीओ क्‍लिप प्रसारित केली असेल किंवा त्याने प्रसारित केलेल्या व्हिडीओला लाईक करणे, त्यावर भाष्य करणे हा गुन्हा आहे. अशा कृतीमुळे गुंडांना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे गुंडाच्या पाठराख्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.  
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT