pune rayat  sakal
पुणे

Pune : रयतच्या पश्चिम- पुणे विभागास आदर्श विभाग पुरस्कार

संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेतील विविध शाळा, विद्यार्थी यांना उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार दिले जातात.

कृष्णकांत कोबल

हडपसर - रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभाग पुणे कार्यालयाला यावर्षी प्रा. डॉ. एन. डी. पाटील आदर्श विभाग पुरस्कार देण्यात आला. संस्थेच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सातारा येथे झालेल्या संस्थेच्या १०४ व्या वर्धापनदिन सोहळ्यात सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक राजेंद्र जगदाळे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेतील विविध शाळा, विद्यार्थी यांना उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार दिले जातात. त्याच पद्धतीने संस्थेच्या प्रशासकीय विभागांनाही शैक्षणिक, भौतिक व गुणवत्तेच्या विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात येतो. पश्चिम विभागाचे चेअरमन आमदार चेतन तुपे पाटील, पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार यांनी हा पुरस्कार स्विकारला.

खासदार श्रीनिवास पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन ॲड. भगिरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख, डॉ. विठ्ठल शिवणकर, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, सहसचिव बंडू पवार, सहसचिव डाॅ. ज्ञानदेव म्हस्के, ऑडिटर डाॅ. शिवलिंग मेनकुदळे आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : मराठी संघटना आज पोलिस उपायुक्तांची भेट घेणार

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT