पुणे

दाखल्यासाठी वरपर्यंत ‘पैसे’ द्यावे लागतात

CD

भाग १
एजंटगिरी सुसाट
अविनाश ढगे
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १२ ः नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र प्रक्रियेनुसार काढायचे असेल तर दोन हजार, हेच अर्जंट पाहिजे असेल तर आठ हजार रुपये द्या. हा दाखला थेट पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजूर होतो. त्यामुळे इथपासून वरपर्यंत सर्वांना ‘पैसे’ द्यावे लागतात, असा धक्कादायक खुलासा निगडीतील नागरी सुविधा केंद्रातील एका एजंटने केला. नागरी सुविधा केंद्राला विळखा घातलेले असे अनेक एजंट दाखले, प्रमाणपत्रे आणि विविध शासकीय कागदपत्रांसाठी नागरिकांची खुलेआम लू करीत आहेत. यावर तहसील कार्यालय मात्र चिडिचूप आहे.
सध्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया आणि विविध शासकीय भरतीसाठी अर्ज भरण्याचा महत्त्वाचा कालावधी सुरू आहे. जात, उत्पन्न, रहिवासी, नॉन-क्रीमी लेयर यांसारखी आवश्यक प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थी-पालकांची धावपळ सुरु आहे. त्यांना वेळेत आणि माफक दरात प्रमाणपत्र काढता यावीत म्हणून निगडीतील अपर तहसील कार्यालयाच्या वाहनतळात नागरी सुविधा केंद्र सुरु झाले आहे. तेथे रोज शेकडो नागरिक येताच एजंट त्यांना गराडा घालतात.
येथे वेळेत काम होत नाही, तुम्हाला कागपत्रांसाठी फेऱ्या माराव्या लागतील, प्रमाणपत्रे वेळेत मिळत नाहीत, अशी कारणे सांगून ते नागरिकांची दिशाभूल करून एका दाखल्यासाठी हजारो रुपये उकळतात. या अनधिकृत एजंटांवर ना प्रशासन कारवाई करी, ना पोलीस प्रशिसन...त्यामुळे यातून नागरिकांची सुटका कधी होणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.
-----------
एजंट आणि ‘सकाळ’ प्रतिनिधीचा संवाद
प्रतिनिधी - मला उत्पन्नाचा दाखला आणि नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र काढायचे आहे
एजंट - कागदपत्रे आणली आहेत का ?
प्रतिनिधी - कोणती कागदपत्रे लागतील
एजंट - आधारकार्ड, रेशनकार्ड, लाईटबील, शाळा सोडल्याचा तुमचा, वडिलांचा आणि आजोबांचा दाखला
प्रतिनिधी - दाखला आणि प्रमाणपत्र किती दिवसात मिळेल
एजंट - १५ दिवसांत मिळेल
प्रतिनिधी - अर्जंट पाहिजे होते
एजंट - अर्जंटमध्ये चार दिवसात दाखला आणि त्यानंतर आठ दिवसात प्रमाणपत्र मिळेल
प्रतिनिधी - किती खर्च येईल
एजंट - उत्पन्नाच्या दाखल्यासाठी नॉर्मल रेट एक हजार आणि नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्रासाठी दोन हजार रुपये आहे
एजंट - अर्जंटमध्ये उत्पन्नाच्या दाखल्यासाठी दोन हजार आणि नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्रासाठी आठ हजार रुपये
प्रतिनिधी - काही कमी होणार नाहीत का ?
एजंट - उत्पन्ना दाखला येथे मिळतो. पण, नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूर होते
एजंट - पुण्यातून काम होत असल्यामुळे इथपासून वरपर्यंत सर्वांना पैसे द्यावे लागतात
एजंट - काम करायचे असेल तर सांगा देतो लगेच करून आमची वरपर्यंत ओळख आहे त्यामुळे प्रमाणपत्र लवकर मिळते...
----------
माझ्या मुलाच्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसाठी उत्पन्नाचा दाखला आणि नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी निगडी अपर तहसील कार्यालयातील सुविधा केंद्रात गेलो असता तेथील एजंटाने तीन हजार रुपये मागितले. एजंटांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात आहे. त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी.
- रमेश जाधव, नागरिक

नागरिकांनी त्रयस्थ व्यक्तीकडे जाऊ नये. थेट सुविधा केंद्रात अर्ज करून दाखला आणि इतर प्रमाणपत्रे मिळवावीत. जर त्रयस्थ व्यक्ती किंवा सुविधा केंद्र चालक जादा पैसे मागत असतील तर सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार करावी.
- जयराज देशमुख, तहसीलदार, हवेली
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Controversy : NEET पेपरफुटीचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत; नाशिकचा 30 वर्षीय BAMS विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात, क्राईम ब्रँचने असा रचला सापळा

Virat Kohli ने ज्या मॉडेलची पोस्ट लाईक केली होती, तिचा खळबळजनक दावा; म्हणाली, 'मला पैशांचं आमिष दाखवलं'

Mumbai News: पालिका शाळेत संविधानाचे धडे, शिक्षण समितीसमोर अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरण, १६ संशयित आरोपी तपास यंत्रणांच्या ताब्यात

Navi Mumbai: नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा कपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT