Agriculture sakal
पुणे

Rain Agriculture : मशागती पूर्ण; आता प्रतीक्षा पावसाची

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पेरण्यासाठीच्या शेतीच्या मशागती पूर्ण केल्या आहेत. आता शेतकरी पेरणीसाठी पुरेशा पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पेरण्यासाठीच्या शेतीच्या मशागती पूर्ण केल्या आहेत. आता शेतकरी पेरणीसाठी पुरेशा पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत. दरम्यान, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून खरिपातील धूळवाफ पेरण्यांना तर, मागील दोन दिवसांपासून काही ठिकाणी भाताची रोपे टाकण्यास सुरुवात झाली आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी पुणे जिल्ह्याला पावणेतीन लाख मेट्रिक टन रासायनिक खते आणि ३० हजार क्विंटल बियाणांचा साठा राज्य सरकारने मंजूर केला आहे. दरम्यान, खरिपात रासायनिक खते व बियाणांची जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करून त्याची जास्त दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर वॉच ठेवण्यासाठी १४ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील तेरापैकी हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे आठ तालुके खरीप तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यांमधील मिळून जिल्ह्यातील एक हजार ३८० गावे ही खरीप गावे आहेत. पुणे जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र (उसासह) तीन लाख ६२ हजार हेक्टर एवढे आहे. यापैकी खरीप पिकांसाठी एक लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे.

खरीप पिकांसाठी पुणे जिल्ह्याला उपलब्ध होणाऱ्या एकूण रासायनिक खतांमध्ये युरिया ३८ हजार ९३६ मेट्रिक टन आणि उर्वरित संयुक्त आणि सरळ खते आहेत. खरिपातील पिकांसाठी पुणे जिल्ह्याला रासायनिक खते आणि बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे खते, बियाणांची टंचाई निर्माण होणार नसल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Assembly Elections 2025: मोठी बातमी! बिहार विधानसभा निवडणुकीचा मुहूर्त ठरला?

Pune Ward Structure: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल?

Uddhav Thackeray : संघटनात्मक बांधणी भक्कम केल्याशिवाय ते जिंकले कसे, आपण हरलो कसे याची उत्तरे मिळणार नाहीत : उद्धव ठाकरे

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT