पुणे, ता. २८ : उजनी धरण परिसरातील सीड प्रकल्पाच्या प्रस्तावित एआय डेटा सेंटरमुळे पाणी आणि विजेचा बेसुमार वापर होऊन शेतकरी, मच्छीमार व पर्यावरणावर गंभीर परिणाम होतील, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी येथे केला.
उजनी धरणाच्या परिसरात सीड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य सरकार, जेएसडब्लू ग्लोबल आणि द सीड कॉन्सोर्टिअम पार्टनर्स यांच्यामध्ये एक लाख ६५ हजार १५४ कोटींच्या गुंतवणुकीचा करार झाला आहे. यात सौरऊर्जा, एआय डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्यूलर रिअॅक्टर हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी जलसंपदा विभागाची शेकडो एकर जमीन हस्तांतरित होणार असून, याला विरोध करण्यासाठी शनिवारी हिंगणगाव येथे आंदोलन होणार असल्याची माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या आंदोलनास त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
पवार म्हणाले, ‘‘भाजप सरकारकडून रोजगार देणारे प्रकल्प गुजरातला नेले जात असून, पाण्याचा बेसुमार वापर करणारे डेटा सेंटरसारखे प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. एआय डेटा सेंटरसाठी किमान नऊ टीएमसी पाणी लागणार असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. तसेच, तरंगत्या सौर प्रकल्पांमुळे जलचरांचा अधिवास धोक्यात येईल.’’
स्मॉल मॉड्यूलर रिअॅक्टरमध्ये दुर्घटना घडल्यास किरणोत्सर्गाचा धोका असून, धरणाला इजा झाल्यास सोलापूरला धोका निर्माण होऊ शकतो.
या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात वीज लागणार असून, त्यासाठीच कर्जत-भीमाशंकर येथे वृक्षतोड करून पंप स्टोरेज प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामुळे होणारी तापमानवाढ, ध्वनिप्रदूषण आणि नैसर्गिक हानीमुळे लाखो शेतकरी व मच्छीमार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल, असा आरोपही पवार यांनी यावेळी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.