Pune Air Pollution
Pune Air Pollution Esakal
पुणे

Air Pollution : पुण्याची हवा अजूनही खराब

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातील हवेची गुणवत्ता अद्याप खराब श्रेणीत असून, प्रदूषणाचा धोका कायम आहे. दिवाळीच्या काळात ‘समाधानकारक’वरून अत्यंत खराब श्रेणीत घसरलेली हवेची गुणवत्ता अजूनही तशीच आहे. त्यामुळे पुणेकरांना प्रदूषित वातावरणाचा अनुभव येत आहे.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) ‘सफर’द्वारे पुणे, मुंबई, दिल्ली आणि अहमदाबाद शहरांच्या हवेची गुणवत्ता सातत्याने नोंदविली जाते. दिवाळीदरम्यान प्रदूषणाची स्थिती दर्शविण्यासाठी हवेची गुणवत्ता कशी असेल, याचा अंदाजही जाहीर केला होता. त्यानुसार लक्ष्मीपूजनाच्या पहिल्या दिवशी शहरातील हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ श्रेणीत होती.

फटाक्यांचा वापरामुळे ५० टक्के अतिरिक्त कार्बन उत्सर्जन लक्षात घेऊन हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीपर्यंत जाण्याचा अंदाज दिला होता. परंतु शहर व परिसरात फटाक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला व अपेक्षित मर्यादेपेक्षा अधिक हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून आले. एकूणच जिल्ह्याची स्थिती पाहिल्यास हवेची गुणवत्ता आता मध्यम श्रेणीत आहे.

हवेच्या प्रदूषणातील प्रदूषकांना पाहता अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम २.५) आणि सूक्ष्म धूलिकणाचे (पीएम १०) प्रमाण वाढले आहे. मागील चार दिवसांपासून मुख्य शहरातील हवेची गुणवत्ता खराब नोंदली जात असून, गुरुवारी (ता. १६) शिवाजीनगर, निगडी आणि लोहगाव परिसरात खराब हवेची गुणवत्ता नोंदविली.

या भागातील अतिसूक्ष्म धूलिकणाचे प्रमाण अजूनही जास्त आहे. त्यात हिवाळ्यात धूलिकण वाहून नेले जात नाहीत. प्रदूषणातील वाढ अशीच कायम असल्याने नागरिकांनीही आरोग्याची काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHT CET 2024 Results Declared: एमएचटी सीईटी निकाल जाहीर, 37 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल! असा पाहा निकाल

Latest Marathi News Live Update : लोकसभा अधिवेशनापूर्वी भाजपची खलबतं

Lavani Gaurav Awards 2024 : पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान! यंदाचे लावणी गौरव पुरस्कार जाहीर

NCERT Syllabus: शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये दंगलीबद्दल का शिकवायचे? ; 'बाबरी मशीद'चे नाव हटवल्यानंतर NCERT संचालकांचा सवाल

" 'Maharashtra 104'चा धुमाकूळ," वाचा नेमकी काय आहे भानगड

SCROLL FOR NEXT