पुणे

प्रवासी सुविधांत पुणे विमानतळाची झेप

CD

पुणे, ता. २९ : विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांच्या सर्वेक्षणात पुणे विमानतळाने बाजी मारली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण व कॅनडास्थित एसीआय-एएसक्यू (एअरपोर्ट काउन्सिल इंटरनॅशनल-एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी) यांनी जुलै ते सप्टेंबरचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात पुणे विमानतळाचा प्रवासी सुविधांच्या बाबतीतील दर्जा अतिशय चांगला ठरला. पुणे विमानतळाने दर्जाच्या बाबतीत ५ पैकी ४.९८ गुण मिळवत देशात पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
विमानतळावरील दर्जाच्या बाबतीत जगभरातील सुमारे ५०० विमानतळांचा यात समावेश होता. भारतातील १६ विमानतळांनी सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदविला. त्यात पुणे विमानतळाने देशात पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे. विमानतळावर प्रवाशांना मिळणाऱ्या सेवासुविधांवर आधारित सर्वेक्षण केले जाते. यासाठी थेट प्रवाशांची मते जाणून घेतली जातात. एसीआय-एएसक्यूचे हे सर्वेक्षण विविध निष्कर्षांच्या आधारे केले जाते. गुणवत्ता वाढीसाठी यात भारतीय विमानतळ प्राधिकरणही सहभागी होते. यासाठी विमानतळाची वर्गवारी केली जाते. पुणे विमानतळ हे ‘बेस्ट एअरपोर्ट बाय साईझ’ या वर्गात असून, यात देशातील १६ विमानतळांचा समावेश आहे.

३१ निकषांच्या आधारे होते सर्वेक्षण :
- स्वच्छतागृहांची स्थिती
- टर्मिनलमध्ये स्वच्छता
- चेक इन काउंटर व सेक्युरिटी काउंटरवर प्रवाशांना लागणारा वेळ
- कर्मचाऱ्यांचा प्रवाशांशी होणारा संवाद
- टर्मिनलवरील खाद्यपदार्थांचे स्टॉल
- आदी बाबींचा विचार केला जातो

या विमानतळांचा समावेश (मिळालेले गुण)
पुणे : ४.९८
चेन्नई : ४.९४
पाटणा : ४.९४
कालिकत : ४.९३
वाराणसी : ४.९३
गोवा : ४.९२
भुवनेश्वर : ४.९१
कोलकता : ४.९०
रायपूर : ४.९०
इंदूर : ४.९०

‘‘पुणे विमानतळाने प्रवासी सेवांमध्ये देशात पहिला क्रमांक पटकावणे, ही समस्त पुणेकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाने केलेल्या अथक प्रयत्नांचे हे फळ आहे. आगामी काळात पुण्याची हवाई कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा देणे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री

‘‘प्रवासी सुविधांच्या दर्जाबाबत पुणे विमानतळाची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय आहे. दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत पुणे विमानतळाची कामगिरी अधिक सरस ठरली आहे. प्रवासी अनुभव, स्वच्छता, सुरक्षा व कर्मचारी सेवेच्या गुणवत्तेची ही खरी पावती आहे.’’
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT