Pune Airport improves in Laggage Travelling
Pune Airport improves in Laggage Travelling 
पुणे

पुणे विमानतळाची मालवाहतुकीत भरारी ; सहा महिन्यांत 72 टक्के वाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे : देशांतर्गत हवाई मालवाहतुकीत पुणे विमानतळाने सहाव्या स्थानी मजल मारली आहे. पुणे विमानतळावरून चालू वर्षातील पहिल्या सहामाहीत तब्बल 72 टक्‍क्‍यांनी मालवाहतूक वाढली आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी दिली आहे. देशांतर्गत हवाई मालवाहतुकीत दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई आणि बंगळूरपाठोपाठ पुण्याने स्थान मिळविले आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहा महिन्यांत तब्बल 72 टक्‍यांनी हवाई मालवाहतूक वाढली आहे. इतर विमानतळांच्या तुलनेत ही वाढ सर्वाधिक आहे. याविषयी अजयकुमार म्हणाले, ""मालवाहतुकीसाठी मोठी विमाने उपलब्ध व्हावीत, यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. ही विमाने आणि त्यासाठीची जागा 28 ऑक्‍टोबरच्या सुमारास उपलब्ध होईल. त्यानंतर मालवाहतुकीत आणखी पन्नास टक्‍क्‍यांनी वाढ होईल. पुणे विमानतळावरून एअर इंडियाने नुकतीच मालवाहतूक सुरू केली. पहिल्या फेरीत त्यातून 550 किलो मक्‍याचे दाणे (बेबी कॉर्न) दुबईला पाठविण्यात आले. अमेरिका, इंग्लंड किंवा युरोपीय देशांत माल पाठविण्यासाठी विशेष विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन एअर इंडिया करीत आहे.'' 

विमानतळाच्या उत्पन्नात 160 टक्के वाढ 

देशातील 28 विमानतळांमध्ये सर्वाधिक उत्पन्नाच्या गटात पुणे विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ अहमदाबाद आणि गोव्याचा समावेश आहे. पुणे विमानतळाचे उत्पन्न मागील आर्थिक वर्षात 160 टक्के वाढले. पुणे विमानतळाचे उत्पन्न आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 56 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये ते 146 कोटी रुपयांवर गेले. हे उत्पन्न 2015-16 मध्ये 30 कोटी, तर 2014-15 मध्ये 28 कोटी रुपये होते. 

मालवाहतुकीत आघाडीवर विमानतळ 
दिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई, बंगळूर, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT