Pune Airport sakal
पुणे

Pune Airport : पुणे टर्मिनल ‘चेकइन’च्या रांगेत; ‘बिकास’ करणार पाहणी

पुणे विमानतळ प्रशासनाने नवीन टर्मिनलवरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यापूर्वी ‘बिकास’ (ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) यांच्याकडे मागितली परवानगी.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे विमानतळ प्रशासनाने नवीन टर्मिनलवरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यापूर्वी ‘बिकास’ (ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) यांच्याकडे परवानगी मागितली आहे. ‘बिकास’चे पथक नवीन टर्मिनलची पाहणी करणार आहे. सुरक्षेसंदर्भातील निकष, जबाबदाऱ्या आदींबाबत ‘बिकास’ समाधानी असेल तरच नवीन टर्मिनलला परवानगी मिळेल.

अन्यथा त्यांनी काढलेल्या त्रुटींची पूर्तता केल्याशिवाय टर्मिनलला परवानगी मिळणार नाही. लवकरच हे पथक पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलची पाहणी करणाऱ्यासाठी येत आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी टर्मिनल सुरू होण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.

पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० मार्चला झाले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नवीन टर्मिनलवरून प्रवासी वाहतूक सुरू होईल, असा अंदाज लावण्यात आलेला होता. मात्र तसे घडले नाही. अद्याप ‘बिकास’ची परवानगीच मिळाली नसल्याने नवीन टर्मिनलवर कोणत्याच कंपनीचे कार्यालय, कस्टम व इमिग्रेशनच्या यंत्रणेचे स्थलांतर झालेले नाही.

सर्व आवश्यक यंत्रणेचे जुन्या टर्मिनलमधून नवीन टर्मिनलवर स्थलांतर झाल्यावर पुन्हा चाचणी होईल. त्यानंतरच प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. १५ एप्रिलच्या आतच नवीन टर्मिनलवरून प्रवासी वाहतूक सुरू होईल, अशी शक्यता विमानतळ प्रशासनाने वर्तवली आहे.

टर्मिनल सुरू करण्यासाठी ‘बिकास’कडे परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतर आवश्यक बाबींची पूर्तता केली जाईल. मगच टर्मिनलमधून प्रवासी वाहतूक सुरू होईल.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

तर आठवड्यातच टर्मिनल खुले

‘बिकास’ची परवानगी मिळाल्यावर एक आठवड्याच्या आतच टर्मिनलवरून वाहतूक सुरू होईल. यापूर्वीच प्रशासनाने विमान कंपन्यांच्या कार्यालयांना स्थलांतर करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच इमिग्रेशन व कस्टमलादेखील पत्र देण्यात आले आहे. कस्टम व इमिग्रेशनच्या यंत्रणेचे स्थलांतर एका दिवसात होईल.

लो फ्लोअर बस दाखल

नवीन टर्मिनलमधून प्रवाशांना एरोमॉलपर्यंत जाण्यासाठी विमानतळ प्रशासनाने २ लो फ्लोअर बस व ९ गोल्फ कार्टची व्यवस्था केली आहे. काही दिवसांपूर्वी ९ मीटर लांबीच्या दोन बस पुणे विमानतळावर दाखल झाल्या आहेत. सध्या बसची चाचणी घेतली जात आहे. नवीन टर्मिनल सुरू झाल्यावर प्रवाशांची ने-आण करण्यासाठी या बसचा वापर होणार आहे.

प्रवाशांसाठी सुविधा

1) प्रवाशांची गर्दी नियंत्रणासाठी सेन्सरचा वापर

2) बॅगेज चेक करण्याचा वेळ वाचावा म्हणून नव्या इन लाइव्ह बॅगेज प्रणालीचा वापर. यामुळे प्रवाशांना रांग लावावी लागणार नाही.

3) लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था व रेस्टॉरंट.

4) प्रवाशांना आराम करण्यासाठी लाउंज. यात एका कमर्शिअल लाउंजचाही समावेश आहे.

5) कार्बन फूट प्रिंट कमी करण्यासाठी विमानतळावर स्काय लाइटचा वापर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

Vastu Tips: घरात पितरांचे फोटो कोणत्या दिशेला लावावेत अन् कुठे लावू नयेत? पाहा वास्तुशास्त्राचे महत्त्वाचे नियम!

Shani Nakshatra Parivartan 2026 : 9 ऑक्टोबरपासून 'या' 5 राशींचे बदलणार नशीब; शनिच्या नक्षत्र बदलाने मिळणार बक्कळ पैसा आणि पदोन्नती!

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

SCROLL FOR NEXT