Pune Airport Survey Sakal
पुणे

Pune Airport : पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे महत्त्वाचे सर्वेक्षण उद्यापासून; दिल्लीहून विशेष पथक होणार दाखल

सर्वेक्षणाचे काम किमान दहा दिवस चालण्याची अपेक्षा आहे. याचा अहवाल नागरी हवाई वाहतूक मंत्रालयात सादर केला जाईल. मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यावर धावपट्टी वाढविण्याच्या कामाला सुरुवात होईल.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे सर्वेक्षण सोमवारपासून सुरू होत आहे. यास ‘ओएलएस’ (ऑब्स्टॅकल लिमिटेशन सरफेस) सर्व्हे असे संबोधले जाते. या सर्वेक्षणाची जबाबदारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे (एआयआय) देण्यात आली आहे. त्यासाठी दिल्लीहून विशेष पथक दाखल होणार आहे.

सर्वेक्षणाचे काम किमान दहा दिवस चालण्याची अपेक्षा आहे. याचा अहवाल नागरी हवाई वाहतूक मंत्रालयात सादर केला जाईल. मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यावर धावपट्टी वाढविण्याच्या कामाला सुरुवात होईल.

धावपट्टीची लांबी व रुंदी वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु होते, मात्र त्यास यश आले नव्हते. अशावेळी याबाबत राज्य सरकारने घेतलेली सकारात्मक भूमिका यासाठी मोलाची ठरली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धावपट्टी वाढविण्यास मंजुरी दिली. त्यानंतर केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे पाठपुरावा केला.

त्यामुळे या सर्वेक्षणास परवानगी मिळाली. पुणे विमानतळाची धावपट्टी ही संरक्षण दलाच्या अधिकारक्षेत्रात येते. त्यामुळे संरक्षण दलाची मंजुरी मिळणे आवश्यक होते. ही मंजुरी मिळाल्यानंतर शासनाच्यावतीने समन्वय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली.

१६० कोटी रुपये खर्च अपेक्षित

सध्या धावपट्टीची लांबी २५३५ मीटर (८ हजार ३१६ फूट) इतकी आहे. रुंदी ४५ मीटर आहे. पूर्वेच्या बाजूला ५०० मीटर व पश्चिमेला ३०० मीटर जागेची आवश्यकता आहे. धावपट्टी सुमारे ८०० मीटरने वाढली तर एकूण लांबी सुमारे १० हजार ९४० फूट इतकी होईल. लांबी सुमारे ११ हजार फूट इतकी झाल्यास मोठी विमानेही उतरू शकतील. यासाठी जागेच्या संपादनावर सुमारे १६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

सर्वेक्षण कसे होणार?

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञ अभियंते सोमवारपासून सर्वेक्षणाला सुरुवात करतील. त्यांच्यासमवेत पुणे विमानतळ प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित असतील. सुरुवातीला धावपट्टीच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील जागेची पाहणी करण्यात येईल.

त्यानंतर विमानतळाच्या जवळपास असणाऱ्या इमारती, झाडांची पाहणी केली जाईल. धावपट्टी वाढल्यावर विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंगला कोणता धोका अथवा अडथळा निर्माण होणार का, याची तपासणी केली जाईल. जर कोणताही अडथळा नसेल तर धावपट्टीच्या विस्तारीकरणाला मंजुरी दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Shinde: ‘नाव घेतल्याने कोणी आरोपी ठरत नाही : मीनाक्षी शिंदे; ‘तपास होऊ द्या, सत्य बाहेर येईल’ शिंदेंचा पलटवार

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

ST NCMC Card: तिकिटाचे पैसे कटल्यानंतर पुन्हा ६० रुपये गायब;एनसीएमसी कार्डचा पहिल्याच दिवशी फटका, ज्येष्ठाची तक्रार

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील गुंडगिरीला अमित शहा जबाबदार- संजय राऊत

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT