Pune Plane runway sakal
पुणे

Pune Airport : पुण्याच्या धावपट्टीला राज्याचा बूस्टर; आता प्रतीक्षा संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीची

पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा प्रश्न आता निकाली लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

- प्रसाद कानडे

पुणे - पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा प्रश्न आता निकाली लागण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

संरक्षण मंत्रालय याबाबत सकारात्मक आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावर लवकरच निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने कामाला गती मिळत आहे.

राज्य सरकारचा वाटा ६० टक्के

धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठी हवाई दलासह खासगी जागेचे देखील भूसंपादन करण्यात येईल. त्यासाठी सुमारे १६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात राज्य सरकार ६० टक्के, पुणे महापालिका २०, पिंपरी चिंचवड महापालिका व पीएमआरडीए प्रत्येकी १० टक्के खर्च करेल. मागील काही महिन्यांपासून हवाई दल व पालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठकाही झाल्या आहेत, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूसंपादनासाठी आग्रही भूमिका मांडली आहे.

मोठ्या धावपट्टीचा फायदा

सध्या पुणे विमानतळावर बोइंग ७३७, एअरबस ए ३१९, ए ३२० , ए ३२१, डॅश ८ व एम्बरेर इआरजे अशा विमानांची वाहतूक होते. याची प्रवासी क्षमता १८० इतकी आहे. या विमानांद्वारे विनाखंडित दूरचा प्रवास करणे शक्य नाही. परिणामी पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय सेवा मर्यादित आहे.

धावपट्टीचा विस्तार झाल्यानंतर एअरबस ३५०, बोइंग ७८७ (ड्रीम लायनर) अशा मोठ्या विमानांची वाहतूक होईल. या विमानांची प्रवासी क्षमता २२० ते ४०० इतकी आहे. या विमानांतून पुणेकरांना थेट अमेरिका, युरोप गाठता येईल. शिवाय हा प्रवास विनाखंडित होणार आहे.

  • ८,८५८ फूट - (२.६९ किलोमीटर) सध्या असलेली लांबी

  • ११ हजार ४८२ फूट - (३.४९ किलोमीटर) वाढ झाल्यानंतरची लांबी

  • २६२४ फूट - (०.७९ किलोमीटर) लांबीत होणारी वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT