Pune Airport sakal
पुणे

Pune Airport : गर्दीवर नियंत्रणासाठी एक्स रे मशिन, सीआयएसएफ जवानांची संख्या वाढविली

गेल्या काही दिवसांपासून पुणे विमानतळावर वाढणारी प्रवाशांची गर्दी हा प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला होता.

सकाळ वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून पुणे विमानतळावर वाढणारी प्रवाशांची गर्दी हा प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला होता.

पुणे - पुणे विमानतळ प्रशासनाने प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी टर्मिनलमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. प्रवाशांच्या बॅग व प्रवाशांची तपासणी लवकर व्हावी या करिता ३ अतिरिक्त एक्स रे मशिन देशांतर्गत (डोमेस्टिक) टर्मिनलमध्ये लावण्यात आल्यामुळे आता ‘डोमेस्टिक’मध्ये एक्स रे मशिनची संख्या ९ झाली आहे. तर दुसरीकडे ‘सीआयएसएफ’च्या जवानांची संख्या वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार ४१ अतिरिक्त जवान विमानतळावर दाखल होणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर वाढणारी प्रवाशांची गर्दी हा प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला होता. दिवसभरात ३० हजारहून जास्त प्रवासी पुणे विमानतळावरून प्रवास करीत आहेत. काहींनी वाढणाऱ्या गर्दीमुळे नाराजी व्यक्त केली, तर काहींनी थेट नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांकडे तक्रार केली. याची दखल घेत विमानतळ प्रशासनाने गर्दीचे विभाजन करण्यासाठी तसेच त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी काही योजना आखल्या आहेत.

विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानांची संख्या केवळ तीन आहे. त्या तुलनेत देशांतर्गत विमानाची संख्या खूप जास्त आहे. देशांतर्गत प्रवाशांची संख्या जास्त असल्याने विमानतळ प्रशासनाने आंतरराष्ट्रीय भागातील एक्स रे मशिन कमी करून डोमेस्टिकमधील मशिन वाढविले आहे. त्याचा चांगला परिणाम आता दिसून येत आहे. यामध्ये सुमारे २५ टक्के गर्दीचे विभाजन झाल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

‘सीआयएसएफ’चे ४१ अतिरिक्त जवान

विमानतळाच्या व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘सीआयएसफ’चे जवान दिवस-रात्र तैनात असतात. पुणे विमानळावर सध्या ४५० जवान तीन शिफ्टमध्ये काम करीत आहेत. मात्र प्रवाशांची संख्या लक्षात घेता ही संख्या कमी पडत आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने विंटर शेड्युलपर्यंत जवानांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ४१ जवानांचा प्रस्ताव दिला. यापैकी १० जवानांची नियुक्ती सध्या विमानतळावर करण्यात आली आहे. तर उर्वरित ३० जवान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दाखल होतील. जवानांची संख्या वाढल्यास प्रवाशांची व त्यांच्या कागदपत्रांची तपासणी लवकर होण्यास मदत होणार आहे.

विमानतळ दृष्टिक्षेपात

  • रोजचे विमानांचे उड्डाण : ९५

  • विमानांची वाहतूक : १९०

  • प्रवासी संख्या : सुमारे ३१ हजार

  • ‘सीआयएसएफ’चे जवान : ४७४ (मंजूर पदे)

  • कार्यरत जवान : ४५०

  • अतिरिक्त मागणी : ४१ जवान

प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांचे विभाजन होणे महत्त्वाचे होते; ते यशस्वीपणे करण्यात आले. यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन तत्काळ अंमलबजावणी केली आहे.

- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT