पुणे

तुंबलेल्या वाहिनीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

CD

आळंदी, ता. २० : पुणे-आळंदी या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर घाणपाणी वाहिनी तुंबल्यामुळे मैला युक्त सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. रस्त्यावरून हे सांडपाणी वाहत असल्याने ये-जा करणारे दुचाकीस्वार, पादचाऱ्यांना सांडपाण्याचा घाण वास सहन करावा लागत आहे. मात्र, ही तुंबलेली वाहिनी साफ केली जात नाही.
आळंदीला येणाऱ्या मार्गावरच घाणपाणी रस्त्यावरून वाहत आहे. मुख्यत्वे पुणे-आळंदी रस्त्यावरून सकाळच्या वेळेत हे पाणी अधिक प्रमाणात वाहते. मैला युक्त पाणी असल्याने चालणे जिकरीचे झाले असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शेजारून मोठी गाडी गेली की सर्व सांडपाणी पायी चालणाऱ्या तसेच दुचाकीस्वार आणि सायकलस्वारांच्या अंगावर उडते.
पुणे-आळंदी रस्त्यावरून पुणे, येरवडा, विश्रांतवाडी, भोसरी भागातून अनेक कामगार वर्ग, विद्यार्थी आळंदीमध्ये येतात. त्याचबरोबर आळंदी नगरपरिषद हद्दीतील काळे कॉलनी भागात राहणारे नागरिक याच रस्त्यावरून ये-जा करतात. लहान मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी महिला जेव्हा बाहेर पडतात तेव्हा एखादी गाडी या पाण्यातून गेली की सर्व सांडपाणी त्या लहान विद्यार्थ्यांच्या अंगावर उडते. विनाकारण भांडणे होण्याचे प्रकार घडत आहेत.
सहा महिन्यांपासून मुख्य रस्त्यावरून हे घाणपाणी वाहिनी तुंबल्यामुळे वाहते आहे. त्याकडे नगरपरिषदेचा आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग दुरुस्तीसाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचे चित्र आहे. या ड्रेनेज लाइन मधील दैनंदिन साफसफाई करताना कर्मचारी कधी दिसत नाहीत.

पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये सांडपाणी वाहिनी तुंबत आहे. त्यांना याबाबत पूर्वकल्पना दिली असून कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. मात्र अद्याप दुरुस्ती झालेली नाही.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT