पुणे

पुणे : आंबिल ओढ्याच्या भिंतीसाठी १२ कोटी रुपये

वर्गीकरण करण्याचा स्थायी समोर प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आंबिल ओढ्याला (ambil odha) बाजूने संरक्षक भिंत बांधण्यासाठी महापालिकेने काम हाती घेतले आहे. यात बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी यासाठी निधी उपलब्ध नव्हता. यासाठी ११ कोटी ९६ लाख रुपये वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

दोन वर्षापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला पूर आला होता, त्यावेळी कात्रज पासून ते नवी पेठे पर्यंत आंबिल ओढ्याचा शेजारील निवासी भागात मोठ्याप्रमाणात वित्त व जीवितहानी झाली होती. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी सीमा भींत बांधण्याची मागणी केली जात होता. त्यानुसार महापालिकेने पद्मजा पार्क ते के. के. मार्केट, पेशवे तलाव ते पद्मजा पार्क, पद्मावती पूल ते गजानन महाराज चौक ते के. के. मार्केट, पद्मावती पूल ते गजानन महाराज चौक ते वैकुंठ स्मशानभूमी मुठा नदी पर्यंत सिमाभिंत बांधण्याचे काम सुरू आहे. यासाठी महापालिकेने सुमारे २० कोटी रुपयांची निविदा काढली आहे. महापालिकेने अंदाजपत्रकात या कामासाठी ९ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.

महापालिकेने या तरतूदीनुसार काम सुरू केले, ही सिमाभींती बांधण्याचे काम सुमारे ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत कामे करायची असल्याने व ठेकेदाराची बिले द्यायची असल्याने ११ कोटी ९६ लाख रुपये वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मलनिःसारण देखभाल दुरूस्ती विभागाने अंदाजपत्रकात शहरात वारंवार ज्या भागात पाणी साचते तेथे पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळी लाईन टाकणे, कलव्हर्ट बांधणे या कामांसाठी तरतूद केली होती. ही तरतूद वर्गीकरणाद्वारे सिमाभिंतीच्या कामासाठी दिली आहे, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT