आंबिल ओढा वसाहत sakal
पुणे

पुणे : आंबिल ओढा वसाहतीचा होणार पुनर्विकास

याकामासाठी १३ कोटी ४२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षीत असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या साने गुरुजी नगर (आंबिल ओढा) येथील वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली. याकामासाठी १३ कोटी ४२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षीत असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत निखिल कन्स्ट्रक्शन या कंपनीने ११.११ टक्के कमी दराने सर्वात कमी खर्चाची निविदा भरली. त्यास मान्यता देण्यात आली. प्रकल्पासाठी सुमारे १३ कोटी ४२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, जीएसटीचे एक कोटी ८१ लाख रुपये आणि रॉयल्टी म्हणून २ लाख ९५ हजार रुपये, मटेरिअल टेस्टिंग साठी २८ लाख ७३ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या वसाहतीमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांची घरे असून, साने गुरुजी नगर पुनर्विकासाचा निर्णय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सध्याची घरे ५० पेक्षा जास्त वर्षाहून जुनी असल्याने काही इमारती धोकादायक झाल्या आहेत. त्यामुळे या वसाहतींच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम पूर्ण करण्यास अडीच वर्ष लागणार आहे, असे रासने यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी फर्निचर आणि पुस्तक खरेदी

पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी बाबूराव सणस विद्यालयात १ कोटी ९७ लाख रुपयांचे फर्निचर आणि ६२ लाख ५१ हजार रुपयांच्या पुस्तकांची खरेदीस स्थायी समितीने मान्यता दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT