divorce  
पुणे

Pune : पत्नीच्या आजारपणाबाबत कळताच घटस्फोटासाठी केला अर्ज; अवघ्या १५ दिवसांत दावा निकाली

सनील गाडेकर, सकाळ वृत्तसेवा

पुणे : संसार सुरू झाल्यानंतर सर्वच सुख-दुःखात एकमेकांना शेवटपर्यंत साथ मिळेल, अशी दोघांची अपेक्षा असते. मात्र येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल झालेल्या एका प्रकरणात पत्नीची किडनी निकामी असल्याचे समजताच पतीने तिची काळजी घेणे सोडून दिले.

पत्नीचे किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर पती तिला भेटायला देखील आला नाही. त्यानंतर पतीने घटस्फोटाची मागणी केल्याचे समजल्यावर तिला आणखी धक्का बसला. अखेर त्यांनी संमतीने घटस्फोट घेत स्वतंत्र वाटा निवडल्या.

२०२२ मध्ये दाखल झालेल्या या प्रकरणात दोघेही पुन्हा एकत्र येऊन संसार करण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. त्यामुळे घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा कालावधी आवश्‍यक नसल्याचे नमूद करून १५ दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांचा घटस्फोट न्यायालयाने मंजूर केला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश हितेश गणात्रा यांनी हा निकाल दिला.

निकिता व नीलेश (नावे बदललेली आहेत) यांचे २०१५ मध्ये अरेंज मॅरेज झाले. लग्नानंतर साधारणत: तीन वर्षे त्यांचा संसार सुरळीत होता. २०१८ मध्ये निकिता यांना अचानक उलट्यांचा त्रास व्हायला लागला. वेगवेगळ्या टेस्ट केल्यानंतर त्यांना किडणीचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले. दोन वर्षे औषधोपचार केल्यानंतर २०१९ मध्ये किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

पत्नीचे आजारपण लक्षात येताच नीलेश यांच्या वागण्यात बदल झाला. त्यानंतर त्यांनी निकिताकडे घटस्फोटाची मागणी करण्यास सुरवात केली. नाइलाजास्तव निकिता उपचाराकरिता तिच्या माहेरी रहायला गेल्या. त्यांच्या माहेरची आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नसल्याने त्यांनी किडनी प्रत्यारोपणासाठी लागणारा खर्च सरकारी योजना आणि काही सामाजिक संस्थांकडून जमा केला. निकिताला तिच्या वडिलांनी किडनी दान केली आहे, असे दाखल दाव्यात नमूद आहे.

उपचार सुरू असताना दावा दाखल

निकिता यांच्यावर उपचार सुरू असताना नीलेश यांनी येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला. माझी फसवणूक झाली असे, त्यात नमुद केले. परंतु फसवणूक झाल्याचे कोणतेही सबळ पुरावे नीलेश यांनी न्यायालयात दाखल न केल्याने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला.

पत्नीचा नांदण्यासाठीचा अर्ज

निकिता यांचे किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर नीलेश व त्यांच्या कुटुंबीयांनी निकिताशी कोणताही संपर्क साधला नाही. त्यामुळे निकिता यांनी २०२२ मध्ये अॅड. अनघा काळे यांच्यामार्फत नांदायला जाण्याचा व पोटगी मिळण्याचा अर्ज दाखल केला. दोघांना न्यायाधीश मध्यस्थकडे पाठविण्यात आले. त्यावेळी नीलेश यांनी निकिता यांना एकरकमी पोटगीची देण्याचे कबूल केले. त्यामुळे त्यांनी सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT