construction sakal
पुणे

पुणे आणि मुंबई बांधकाम क्षेत्रात पुन्हा अव्वल स्थानावर

बांधकाम क्षेत्रात मोठा वाटा असलेल्या पुणे आणि मुंबई शहराने कोरोनाच्या लाटेतून सावरत पुन्हा आपले स्थान मजबूत केले आहे.

सनील गाडेकर

बांधकाम क्षेत्रात मोठा वाटा असलेल्या पुणे आणि मुंबई शहराने कोरोनाच्या लाटेतून सावरत पुन्हा आपले स्थान मजबूत केले आहे.

पुणे - बांधकाम क्षेत्रात मोठा वाटा असलेल्या पुणे आणि मुंबई शहराने कोरोनाच्या लाटेतून सावरत पुन्हा आपले स्थान मजबूत केले आहे. बांधकाम क्षेत्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या देशातील आठ शहराच्या तुलनेत पुणे आणि मुंबईमध्ये यंदाच्या तिसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर २०२२) दरम्यान सर्वाधिक घरांची विक्री झाली आहे.

पुणे, मुंबई, बेंगळुरू, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली एनसीआर, हैदराबाद आणि कोलकता या आठ शहरातील एकूण विक्रीत ५३ टक्के वाटा हा मुंबई आणि पुण्याचा आहे. गेल्या वर्षी देखील या दोन शहरांत सर्वाधिक विक्री झाली होती. मागील वर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशात ५५ हजार ९१० सदनिकांची विक्री झाली होती. यंदा त्याच काळात ८३ हजार २२० सदनिका विकल्या गेल्या आहेत. टक्केवारीचा विचार केला असता, ही ४९ टक्के वार्षिक वाढ आहे. ऑनलाइन रिअल इस्टेट व्यासपीठ प्रॉपटायगर डॉटकॉमने सर्व्हे केल्यानंतर जाहीर केलेल्या निवासी बाजारपेठ ट्रेण्ड्सवरील त्रैमासिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. देशभरातील प्रकल्पांमधील सदनिकांच्या किमतीचा विचार केला असता, बहुतांश नवीन पुरवठ्याची किंमत एक ते तीन कोटी रुपयांपर्यंत होती. या किमतीच्या घरांचा वाटा ३२ टक्के होता. त्यानंतर ४५ ते ७५ लाख किंमत असलेल्या सदनिकांचा वाटा ३१ टक्के आहे.

देशात गेल्या तिमाहीत विक्री झालेल्या बहुतांश सदनिकांची किंमत ही ४५ ते ७५ लाखांच्या दरम्यान आहे. गेल्या तीन महिन्यांत एक लाख चार हजार ८२० सदनिका लॉन्च करण्यात आल्या आहेत. एकूण नवीन पुरवठ्याची गेल्या वर्षाशी तुलना केली असता त्यात ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ही वाढ तीन टक्क्यांची आहे.

बांधकाम क्षेत्र कोरोना आणि त्यानंतर झालेल्या परिणामांमधून पुन्‍हा सावरत असल्याचे अहवालातील डेटा ट्रेंड व माहितीमधून स्पष्टपणे दिसून येते. सणासुदीच्या काळात मालमत्ता गुंतवणुकीबद्दल ग्राहकांच्या सकारात्मक भावनांमध्ये सतत वाढ होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. गेल्या तिमाहीत घरांच्या मागणीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. त्यामुळे पुढच्या तिमाहीसाठी देखील उत्तम मागणी दिसून येईल.

- विकास वाधवान, मुख्य वित्त अधिकारी, हाउसिंग डॉटकॉम, प्रॉपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT