pune Sakal
पुणे

Pune : खडकवासला चौपाटी परिसरात मोकाट जनावरांचा वावर; वाहनांची वर्दळ असल्याने अपघाताचा धोका

उपाययोजना करण्याची मागणी

निलेश बोरुडे

किरकटवाडी - मुख्य सिंहगड रस्त्यावर खडकवासला धरण चौपाटी परिसरात मागील काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. अगोदरच या परिसरात अरुंद रस्ता असल्याने व वाहनांची वर्दळ जास्त असल्याने या मोकाट जनावरांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे नाहक एखाद्याचा बळी जाण्याच्या अगोदर संबंधित विभागाने याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी नागरिक करत आहेत. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या भटकी जनावरे पकडणाऱ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

खडकवासला धरण चौक ते डीआयएटी गेट दरम्यान आठ ते दहा मोकाट जनावरे दिसून येतात. चौपाटी परिसरात पर्यटकांनी खाऊन टाकलेली मक्याची कणसे, कणसावरील कपटे खाण्यासाठी ही जनावरे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला ये-जा करतात. काही जणावरे रस्त्याच्या मधोमध येऊन थांबतात.

या परिसरातील रस्ता अगोदरच अरुंद आहे. तसेच जागोजागी वळणे असल्याने पुढील रस्ता दिसत नाही. त्यामुळे अचानक जणावरे समोर दिसत असल्याने वाहनचालकांना वाहन नियंत्रित करणे अवघड होत आहे. या जनावरांमुळे अपघात झाल्यास नाहक एखाद्याचा जीव जाऊ शकतो त्यामुळे अशाप्रकारे जनावरांना मोकाट सोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

"अंधारात जनावरे आडवे आल्याने वाहन नियंत्रित करताना गोंधळ होत आहे. या रस्त्यावरून अगोदरच वाहनांची वर्दळ जास्त असते, त्यामुळे जनावरांना चुकविण्यासाठी वाहन दुसरीकडे घेतल्यास अपघात होऊ शकतो. प्रशासनाने याबाबत दखल घेऊन कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे."

गणेश वाघमारे, नागरिक.

"जनावरे नेमके कोणत्या वेळी येतात याबाबत माहिती घेण्यात येईल व योग्य ती कारवाई करण्यात येईल."

- सुहास पांढरे, स्वच्छता निरीक्षक, पुणे मनपा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SBI ATM Cash Charge: UPI नंतर आता ATM कॅश विड्रॉलवरही चार्ज! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम

IND A vs AUS A: भारताच्या विजयात 'मुंबई'कर चमकले! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले, मालिकेत १-० ने आघाडी

ती बाहेर मोठी सेलिब्रिटी असेल पण घरी... अपूर्वा नेमळेकरबद्दल काय म्हणाले सासरे; दीर म्हणतात- तिने सहा महिने...

Lalbaugcha Raja: पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाची निरोपाची आरती; डोळे पाणावणारा क्षण VIDEO

Maharashtra Ganesh Visarjan Live: मनाचा तिसरा गुरुजी तालीम मिरवणुकीत ढोल ताशांची अफलातून जुगलबंदी

SCROLL FOR NEXT