आंदोलन Sakal
पुणे

Pune : पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन

लिपिक, शिपायांची पदे कमी करण्याच्या धोरणास विरोध

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पशुसंवर्धन विभागाच्या सुधारित आकृतिबंधामध्ये गट ‘ड’ संवर्गातील सर्वच तर, कनिष्ठ लिपिक संवर्गातील काही पदे रद्द करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. या धोरणाच्या विरोधात पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघटनेने सोमवारपासून (ता. २८) असहकार आंदोलन पुकारले आहे.

या संदर्भात महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. गट ‘क’मधील लिपिक टंकलेखक, वाहनचालक तसेच ‘ड’ मधील नाईक, दफ्तरबंद, शिपाई, परिचर, रात्रपहारेकरी संवर्गातील अनेक पदे निरस्त करण्यात आली आहेत. भविष्यात ही पदे कमी करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या सुधारित आकृतीबंधाबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पशुसंवर्धन विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. परंतु पशुसंवर्धन विभागाचा सुधारित आकृतिबंध करताना याकडे दुर्लक्ष झाले आहे.

या आकृतीबंधामधील पदे रद्द करण्याचा प्रस्ताव पूर्णपणे रद्द करण्यात यावा. न्याय्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लिपिक कर्मचारी १४ नोव्हेंबरपासून काळी फीत बांधून काम करीत आहोत. २५ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे सुधारित आकृतिबंध रद्द करावा, यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. तथापि त्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने सोमवारपासून असहकार आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या संदर्भात महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालून कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष अंकुश शेजाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Bandh: देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन! आज महाराष्ट्र बंद, कोणत्या सुविधा चालू तर कोणत्या बंद? जाणून घ्या...

RadhaKrishna Irrigation Project : कृष्णा नदीच्या पाण्यावरून वाद पेटला! कोल्हापुरातील प्रस्तावित धरणाला कर्नाटकचा तीव्र विरोध; कन्नड संघटनांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

Instagram New Feature : इंस्टाग्रामवर पोस्ट डिलीट न करता बदला गाणं; Replace Audio फीचर लॉन्च, कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

IND vs ZIM Pitch Report: हरारेची खेळपट्टी आज नेमकी कशी खेळणार? फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? सामना FREE कुठे पाहणार?

SCROLL FOR NEXT