Animal Husbandry Department staff Agitation sakal
पुणे

Pune News: पशुसंवर्धच्या कर्मचारी संघाचे आयुक्तालयासमोर आंदोलन

पशुसंवर्धन विभागाच्या प्रस्तावीत करण्यात आलेल्या आकृतीबंधास पशुसंवर्धन विभाग कर्मचारी

बाबा तारे

औंध : पशुसंवर्धन विभागाच्या प्रस्तावीत करण्यात आलेल्या आकृतीबंधास पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघाने विरोध दर्शविला असून याविरोधात औंध येथील आयुक्तालयासमोर आंदोलन केले.पशुसंवर्धन खात्याच्या या प्रस्तावीत आकृतीबंधांतर्गत गट 'क' व गट 'ड' कर्मचारी यांची अधिक्षक, सहाय्यक वैरण विकास अधिकारी, लघुलेखक, वरीष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, वाहन चालक, नाईक, व्रणोपचारक, मुकादम, परिचर, शिपाई इत्यादी पदे निरासीत करण्यात आलेली असून त्याऐवजी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी (गट- अ) व पशुधन विकास अधिकारी (गट-ब) ही पदे वाढविण्यात येणार आहेत.

संबंधित तांत्रिक विभागातील गट-'अ' व गट 'ब' अधिकारी यांची मोठ्या प्रमाणवर पदे वाढविण्यात आलेली आहेत.परंतु गट 'क' व गट 'ड' संवर्गातील पदे मोठया प्रमाणात कमी झाल्यास ही पदेही अल्प प्रमाणात शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे या पदांवर काम करणा-या कर्मचा-यांवर अतिरिक्त कामाचा ताण येऊन शारीरीक व मानसिक प्रकृतीवर परिणाम होईल असे कर्मचारी संघाकडून सांगण्यात आले आहे.

तसेच या प्रस्तावीत आकृतीबंधामध्ये गट 'क' व गट 'ड' संवर्गातील पदोन्नतीचे पदे कमी केल्याने, या कर्मचा-याच्या पदोन्नतीच्या संधी उपलब्द्ध होणार नाहीत. त्यामुळे या पदांवर काम करणा-या कर्मचा-यांना दिर्घकालीन काम केल्यानंतर आश्वासित प्रगती योजना या लाभांवर अवलंबून राहावे लागणार असून फक्त एकाकी पदाचा लाभ प्राप्त होणार आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. त्यातही अतिरिक्त कामांचा ताण वाढविण्यात आल्याचे संघटनेचे म्हणने आहे. सरकारी निर्णयानुसार आपल्या खात्यातील गट 'अ' ते गट 'ड' मध्ये मयत झालेल्या कर्मचा-यांच्या पाल्यांना गट 'क' व 'ड' च्या पदांवर अनुकंपा तत्वावर सरकारी सेवेत समाविष्ट करण्यात येते.

परंतु या प्रस्तावीत आकृतीबंधामध्ये गट 'क' ची पदे कमी केल्याने व गट 'ड' ची सर्व पदे निरासीत केल्याने मयत झालेल्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर सरकारी सेवेची संधी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट येऊन उपासमारीची वेळ येऊ शकते.यामुळे कर्मचारी संघाने यास विरोध करून निषेध नोंदवत आज औंध येथे आंदोलन केले. यावेळी सीमा लोहकरे,कल्याणी आवटे,सीमा खरे,मंजुषा जाधव,राजश्री कदम, श्रीकांत सोनवणे, संतोष जामदार,अभिजीत कोरे, सुभाष मेंढे,उमेश वाल्मिकी,अजय बेंद्रे, योगिता मांगुळकर, अमरसिंग कुंभार इत्यादी उपस्थित होते

या आकृतीबंधामुळे आमची अनेक पदे निरासीत होणार असून यामुळे आम्हाला पदोन्नती मिळणार नाही. आमच्या भविष्यावर याचा परिणाम होणार असल्याने आमचा या आकृतीबंधास विरोध आहे....प्रियंका भगत, कार्याध्यक्ष पशुसंवर्धन विभाग कर्मचारी संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT