Accident News sakal
पुणे

Pune: कल्याणीनगरमध्ये अजून एक कार अपघात, अल्पवयीन विद्यार्थ्याचा मृत्यू

Kalyani Nagar Accident: घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आलेले असून अधिक तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

Vishrantwadi: आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास येरवडा येथील कल्याणीनगर भागातील मेरी गोल्ड सोसायटीसमोर कार आणि सायकल यांच्या झालेल्या धडकेत शाळेला सायकलवरून जाणारा मुलगा शाश्वत राम बोगाडे (वय 15 वर्षे, राहणार - कुमार कृती सोसायटी, कल्याणनगर) गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

हुंडाई मोटरकारचालक रविकांत रामदिन गौर( वय 37 वर्षे, राहणार - रोहन निगम अपार्टमेंट, विमाननगर) यास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. वैद्यकीय तपासणीत मद्यप्राशन केलेले नाही, असा अहवाल प्राप्त झालेला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आलेले असून अधिक तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT