पुणे

पिस्तुलाचा धाक दाखवणाऱ्या लुटारू टोळीला बेड्या

CD

कुरुळी, ता. २० : चाकण एमआयडीसीत पिकअप चालकाला पिस्तूलसदृश शस्त्राचा धाक दाखवून एक लाख आठ हजार रुपये लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून कार, दुचाकी आणि पिस्तूल असा ११.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सार्थक पोपट दाते (वय २१), अजित बन्सी पारधी (वय २२), सत्यवान सुनील देवकर (वय १९), हनुमंत भास्कर दाते (वय २७) आणि यश सोमनाथ पवार (वय २०, सर्व रा. जांबुत खुर्द, ता. संगमनेर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सोमवारी (ता. १०) रात्री १०.५० च्या सुमारास दक्षिण महाळुंगे हद्दीत ही घटना घडली होती. फिर्यादी धीरज यादव आणि चालक रामभवन सिंह यांनी बँकेतून काढलेली रोकड घेऊन जात असताना आरोपींनी इर्टिगा कार आणि दुचाकी आडवी लावून त्यांना लुटले होते. घटनेनंतर गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने १२० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपींची ओळख पटवली. संगमनेर परिसरातून पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली इर्टिगा, दुचाकी, छऱ्याचे पिस्तूल, मोबाइल आणि २४ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दक्षिण महाळुंगे पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT