police sakal
पुणे

Pune : वरवंड-कासव शिकार प्रकरणात आणखी दोन जण अटकेत

कासव शिकार प्रकरणी आता एकुण चार आरोपींची संख्या झाली

अमर परदेशी, वरवंड

वरवंड : येथील कासव शिकार प्रकरणाची पुणे प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी गंभीर दखल घेत वनअधिकाऱयांना सखोल तपासाचे आदेश दिले.या पाश्वभुमीवर सहायक वनउपसंरक्षक दिपक पवार व तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी खेंडके यांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली.वनविभागाने सायंकाळी आणखी दोन जणांना अटक केली.शंकर सावंत व भिमराव सावंत रा.वरवंड ता.दौंड जि.पुणे अशी आरोपींची नावे आहे.कासव शिकार प्रकरणी आता एकुण चार आरोपींची संख्या झाली. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची वनकोठडी सुनावली.

दौंड तालुक्यातील वरवंड येथील कानिफनाथ नगर भागात एका ठिकाणी काही जणांनी खाण्याच्या उद्देशाने कासवाला चुलीवर भाजुन कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला.या घटनेची माहीती मिळताच वनपरिमंडल अधिकारी शितल खेंडके व वनरक्षक शितल मेरगळ यांनी वनकर्मचाऱयांसह संबधीत ठिकाणी छापा टाकुन आरोपींना रंगेहात पकडले.सदर आरोपींना दौंड न्यायालयात हजर केले असता.त्यांना सात दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली.

मात्र,घटनेचे गांर्भीय लक्षात घेवुन पुणे प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंवरक्षक राहुल पाटील यांनी लक्ष घालत कासव शिकार प्रकरणा विषयी आपली भुमिका स्पष्ट करीत वनअधिकाऱयांना सखोल तपासाचे आदेश दिले.या पाश्वभुमीवर सहायक उपवनसंरक्षक दिपक पवार हे घटनेच्या तपासकामी दोन दिवस दौंड वनपरिक्षेत्र कार्यालयात ठाण मांडुन आहेत.वनअधिकाऱयांनी त्यांच्या खास शैलीत आरोपी नाना सावंत व दादा सावंत यांच्याकडे चौकशी केली असता. आणखीन दोन आरोपींची नावे समोर आली.शंकर सावंत याने कासवाला जाळ्यात पकडले तर भिमराव सावंत याने आरोपींना पुरवल्याचे समोर आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे व वनपरिमंडल अधिकारी शितल खेंडके,शितल मेरगळ आदी वनपथकाने वरवंड येथील संबधीत आरोपींना ताब्यात घेतले.दौंड न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना सात दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली.अशी माहीती सहायक वनउपसंरक्षक दिपक पवार यांनी दिली. दरम्यान,कासव शिकार प्रकरणातील चारही आरोपींना सात दिवसांची वनकोठडी मिळाली असुन चौकशीत आणखीन माहीती समोर येण्याची शक्यता वनअधिकाऱयांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT