Vikram Kumar Sakal
पुणे

पुणे : मनोरुग्णालय आवारातील विविध उपक्रमांसाठी मदत उपलब्ध करून देण्यात येईल

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय आवारातील विविध उपक्रमांसाठी पुणे महापालिकेच्या वतीने सीएसआरच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यात येईल.

रूपाली अवचरे

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय आवारातील विविध उपक्रमांसाठी पुणे महापालिकेच्या वतीने सीएसआरच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यात येईल.

विश्रांतवाडी - येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय आवारातील विविध उपक्रमांसाठी पुणे महापालिकेच्या वतीने सीएसआरच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यात येईल. अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. त्यासोबतच शासनाने मान्यता दिल्यास पुणे महापालिकेच्या वतीने मनोरुग्णालयाच्या आवारातील इतर भौतिक सोयीसुविधा व उपाययोजनांसाठी संयुक्त प्रकल्प राबविण्यासाठी देखील सहकार्य करू असे आश्वासन पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी यावेळी दिले. येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विक्रम कुमार बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, भाजपचे प्रवक्ते मंगेश गोळे, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. लता पांढरे, कार्यक्रमाचे संयोजक गणेश बाबर, यांच्यासह रिज़वाना शेख, मेहमूद खान,चंद्रकांत जंजीरे, शशिकांत कुलकर्णी, किसन बाबर, सुभाष चव्हाण, महमूद खान, फहीम शेख, राहुल जाधव, सागर कांबळे, हुसैन तांबोळी, मुश्ताक शेख, जगन ठोम्बरे, कृष्णा सदभैया, रज़्ज़ाक सय्यद, प्रीति भट्टी, शामा जाधव, श्वेता पवार यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी आवश्यक त्या सोयीसुविधा तसेच आवारातील जुन्या व जीर्ण इमारती, सार्वजनिक स्वच्छता, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन अशा आवश्यक बाबींसाठी पुणे महापालिकेच्या वतीने योग्य ती मदत केली जाईल. इतर आवश्यक बाबींसाठी सीएसआरच्या माध्यमातून निधी उभारून मनोरुग्णालय प्रशासनाच्या आवारातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. मनोरुग्णालयातील महिला रुग्णांनी आयुक्त तसेच उपस्थित मान्यवरांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महापालिका आयुक्त विक्रम कुमारदेखील काही वेळ भावुक झाले होते. मनोरुग्णालय आवारातील परिसराचीदेखील त्यांनी यावेळी पाहणी केली. तसेच आवश्यक त्या सोयी सुविधा तातडीने रद्द करणे बाबतच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. सूत्रसंचालन व आभार अज़हर खान यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

Satara PNG Gas: साताऱ्यात ऊर्जा क्रांती! ४०० घरांमध्ये पाइप गॅस पोहोचला, १० हजार घरांना मिळणार मोठा दिलासा

फसव्या जाहिराती, निकृष्ट दर्जा! सौंदर्यप्रसाधनांवर FDAची कारवाई; गैरप्रकार सहन केला जाणार नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गकरांनो, आणखी वाट पाहावी लागणार! मॉन्सून पूर्णपणे मंदावला; पाहा पुढील 4 दिवसांचा अंदाज, शेतीची कामे रखडली

Fifa World Cup 2026 : जपानी फॅन्स मॅचनंतर स्टेडियममधील कचरा का उचलतात? त्या तरूणीनं 'Meiwaku' बद्दल सांगितलं, जाणून घ्या काय आहे ते?

SCROLL FOR NEXT