ACB sakal
पुणे

Pune Crime : सहायक आयुक्त लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अन्न व औषध प्रशासन विभागात छापा टाकून एका सहायक आयुक्ताला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले.

सकाळ वृत्तसेवा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अन्न व औषध प्रशासन विभागात छापा टाकून एका सहायक आयुक्ताला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले.

पुणे - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अन्न व औषध प्रशासन विभागात छापा टाकून एका सहायक आयुक्ताला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. सोमवारी (ता. २०) ही कारवाई करण्यात आली.

साहेब एकनाथराव देसाई असे ताब्यात घेतलेल्या सहायक आयुक्ताचे नाव आहे. याबाबत एका ५४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त श्रीहरी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीने लॅक्टोज विक्रीच्या परवान्यासाठी कंपनीमार्फत अन्न व औषध प्रशासन विभागाकडे अर्ज केला होता.

परंतु हा अर्ज मंजूर करण्यासाठी अन्न विभागाचे सहायक आयुक्त साहेब देसाई याने तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात संपर्क साधला. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी औंध येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात छापा टाकला. त्यावेळी देसाई याला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.

सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास प्रशासकीय इमारतीमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.

तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक -

  • हेल्पलाइन टोल फ्री १०६४

  • दूरध्वनी क्रमांक- ०२०- २६१२२१३४, २६१३२८०२

  • व्हॉटस॒ॲप क्रमांक- ७८७५३३३३३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT