पुणे

खड्डे शोधण्यासाठी ‘एथर’ची मदत

CD

पुणे, ता. २८ : पुणे, ता. २८ : शहरातील रस्त्यांवरील खड्डे, गतिरोधक आणि अन्य अडथळे शोधण्यासाठी पुणे महापालिका आता ‘एथर स्कूटर’च्या अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. यासंदर्भात महापालिका आणि एथर एनर्जी लिमिटेड यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला.

पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानंतरही महापालिकेकडून त्याची तातडीने दुरुस्ती होत नाही. महापालिकेच्या ‘पीएमसी ॲप’, ‘रोड मित्र’ ॲपद्वारे नागरिक शहराच्या वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांच्या दुरवस्थेसंबंधीची माहिती देतात. नगरसेवकांकडूनही रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सभागृहामध्ये आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष या प्रश्‍नाकडे वेधले जाते. तरीही, खड्ड्यांचा प्रश्‍न सुटत नाही. खड्ड्यांमुळे नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. दरम्यान, महापालिका रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यांवरील खराब पट्टे आणि गतिरोधकांची माहिती मिळविण्यासाठी ‘एथर स्कूटर’ची मदत घेणार आहे. त्यासंदर्भात महापालिका आणि एथर एनर्जी लिमिटेड यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार झाला. यावेळी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप उपस्थित होते.

‘जीपीएस’द्वारे मिळणार माहिती
एथरच्या २४ हजारांहून अधिक दुचाकी शहरात आहेत. या कनेक्‍टेड दुचाकींमधील अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्त्यांवरील खड्डे, रस्त्यांवरील खोदकामाचे पट्टे, गतिरोधक आणि अन्य अडथळ्यांची ‘जीपीएस’ आधारित माहिती महापालिकेला मिळणार आहे. ‘रोड हेल्थ मॅप्स’च्या माध्यमातून समस्या असलेले रस्ते ओळखणे, दुरुस्तीचे नियोजन करणे आणि वारंवार खराब होणाऱ्या ठिकाणांवर लक्ष ठेवून ते दुरुस्त करण्याचे काम केले जाणार आहे.

संबंधित कंपनीकडून रस्त्यांबाबत मिळणारी माहिती महापालिकेच्या प्रत्यक्ष पाहणीला पूरक ठरणार आहे. मात्र, संबंधित माहितीची क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर पडताळणी केली जाईल. त्यानंतरच दुरुस्तीचे निर्णय घेतले जाणार आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ते अधिक चांगले करण्यासाठी हा प्रयत्न आहे.
- प्रजीत नायर, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT